मुंबईः फॅशनचा सर्वात मोठा कार्यक्रम असलेल्या मेट गाला 2022 मध्ये हॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या सनसनाटी लुक्सने कार्यक्रम गाजवत आहेत. भारतीय सेलेब्सही त्यांच्या खास स्टाइलने बाजी मारताना दिसत आहेत. मेट गाला २०२२ मध्ये सब्यसाची डिझायनर साडी परिधान करून सोशलाईट आणि महिला  व्यावसायिक नताशा पूनावालाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नताशाच्या या जबरदस्त लुकने फॅशन विश्वालाही प्रभावित केलं आहे. नताशाने फॅशनच्या सर्वात मोठ्या इव्हेंटसाठी प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीचा पोशाख निवडला. नताशा सब्यसाचीच्या ऑल-गोल्डन पोशाखात ग्लॅमर दिवापेक्षा काही कमी दिसत नाही. 



यावेळी मेट गालाचा ड्रेस कोड 'गिल्डेड ग्लॅमर' असा ठेवण्यात आला होता. या ड्रेसकोडला नक्कीच नताशाने पूर्णपणे न्याय दिला आहे. नताशाची ही सुंदर साडी सब्यासाचीने डिझाईन केली आहे. ही सब्यसाचीची सोन्याची हस्तकला असलेली साडी आहे.



साडीचा ट्रेल सेमी प्रिशियस स्टोन्स, सेक्विन आणि ऍप्लिकेड प्रिंटेडने बनवला आहे. साडीसोबत परिधान केलेले दागिने सुद्धा सब्यसाचीचेच आहेत. हे दागिने पारंपारिक तंत्र वापरून बनवले गेले. 



नताशा पूनावालाचा हा अप्रतिम लूक अनिताश्रॉफ अदाजानिया यांनी स्टाईल केला आहे. नताशाच्या या लूकवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहते फायर आणि हार्ट इमोजी पोस्ट करत आहेत... 



नताशाच्या मेट गाला लूकमध्ये खूपच उठून दिसत आहे. यावर नताशाने तिचा गोल्डन लुक हायलाइट करत गोल्डन आयशॅडो आय मेकअप केला आहे.