मुंबई : नुकतीच ६६ व्य़ा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. देशभरातील विविधभाषी चित्रपटांना केंद्राकडून गौरवण्यात आलं, ज्यानंतर पुरस्कार जाहीर झालेल्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता आयुषमान खुराना याला 'अंधाधुन' आणि विकी कौशल याला 'उरी' या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. ज्यानंतर आयुषमान आणि विकीने त्यांचा आनंद व्यक्त केला. एक सुरेख अशी सोशल मीडिया पोस्ट लिहित आयुषमानने अवघ्या काही ओळींमध्येच त्याचा आनंद व्क्त केला. 


जब पहली दफा आया था मुंबई
तब भी हो रही थी बारीश | 
आज भी बरखा बहार है.


यहाँ की भीड की तरह सपने थे
आँखों मे हजार, 
आज भी उमंगे तेज तर्रार हैं | 


माँ बाप ने नम आँखोंसे दी थी मुझे परवाझ, 
आज भी उनकी फिक्र बरकरार है | 


सेकंड क्लास स्लीपर पे आया था 
इस शहर मे दोस्तों के साथ, 
आज भी उसी सफर का खुमार है | 


उठ कर गिरा, गिर कर उठा |  चला |  उडा | 
आज उन्ही ठोकरों की खातिर मेरे हक मे राष्ट्रीय पुरस्कार है | 



अशा ओळींमध्ये आयुषमानने एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून नेमकी त्याची जडणघडण कशी झाली, याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधतानाही त्याने याविषयीचा आनंद व्यक्त केला. ''ज्या दोन चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे, अशा 'बधाई हो' आणि 'अंधाधुन' या दोन्ही चित्रपटांना मानाचा असा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मला प्रचंड आनंद होत आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की या देशातील जनतेला असे चित्रपट हवे आहेत, जे त्यांचं मनोरंजन करु शकतली, ज्याविषयी चे चर्चा करु शकतील'', असं तो म्हणाला होता.