16 सप्टेंबर रोजी देशभरात कुठे ही चित्रपट पाहायला गेलात तर होईल फायदा, जाणून घ्या खास कारण
जाणून घ्या कोणता फायदा होणार...
मुंबई : अमेरिकेत चित्रपटगृहांनी घोषित केले आहे की ते 3 सप्टेंबर रोजी त्यांच्या 'राष्ट्रीय सिनेमा दिना'ला $3 किंवा सुमारे 239 रुपये किमतीत चित्रपटाची तिकिटं विकणार आहे. यानंतर, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील सिनेमागृहांनी 16 सप्टेंबर रोजी भारतात 'राष्ट्रीय सिनेमा दिन' साजरा करण्याचा आणि 75 रुपयांना तिकीट विकण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एनसीआरमध्ये सरासरी तिकिटाची किंमत 200 ते 300 रुपये आहे. PVR, INOX, Cinepolis, Carnival, Miraj आणि Citipride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि डेलाइट सारख्या सिनेमा हॉलसह देशभरात सुमारे 4 हजार स्क्रीन्स आहेत, तिथे हे तिकिट 75 रुपयानं विकण्यात येणार आहे.
आणखी वाचा : ऐश्वर्या रायच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, कलाविश्वाला मोठा धक्का
MAI नं एका निवेदनात म्हटले की, 'राष्ट्रीय चित्रपट दिन सर्व वयोगटातील प्रेक्षकांना एकत्र घेऊन चित्रपटाचा आनंद घेतील. हे चित्रपटगृह पुन्हा एकदा सुरु झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी देखील आहे. तर प्रत्येक चित्रपटप्रेमीसाठी हे आमंत्रण आहे.
असोसिएशननं असा दावा केला आहे की भारतातील चित्रपटसृष्टी सगळ्यात लवकर रिकव्हरी करते असं पाहायला मिळालं आहे. यंदाच्या वर्षी 'KGF: Chapter 2', 'RRR', 'विक्रम', 'भूल भुलैया 2' आणि 'डॉक्टर स्ट्रेंज' आणि 'टॉप गन: मेवरिक' सारखे सर्वात हिट चित्रपटप्रदर्शित झाले.
MAI चे अध्यक्ष कमल ग्यानचंदानी म्हणाले, 'ही 75 रुपये तिकीटाची ऑफर IMAX, 4DX मध्ये त्या आठवड्यात थिएटरमध्ये येणार्या सर्व सिनेमा आणि चित्रपटांवर लागू होईल. या ऑफरमध्ये लक्झरी व्हेरिएंट समाविष्ट केले जाणार नसले तरी ते सवलतीच्या दरात देखील उपलब्ध असतील. आम्ही सिनेमा साजरा करण्यासाठी 16 सप्टेंबर निवडला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जे कुटुंब बरेच दिवस चित्रपट पाहण्यासाठी बाहेर पडले नाही ते देखील या कार्यक्रमासाठी सिनेमा हॉलला भेट देतील.'