Dadasaheb Phalke Award 2024 :  भारतातील 70 वा राष्ट्रीय पुरस्कार आज दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडला. या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्यामधील कलाकार आणि क्रू यांना त्यांच्या मेहनतीसाठी गौरविण्यात आहे. ऑगस्टमध्येच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्तीला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याच्या योगदानाचे कौतुक केले होते. त्यांचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. 


पुरस्कार मिळताच मिथुन चक्रवर्ती भावूक 


दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती भावूक झाला होता. त्यानंतर मिथुनने आपल्या प्रवासाबद्दल सांगितले. तो म्हणाला की, जेव्हा मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तेव्हा मी स्वत: ला अल पचिनो समजू लागलो. मग मला एक किक मिळाली आणि मी शहाणा झालो. माझ्या रंगामुळे मला काहीतरी ऐकायला मिळाले. हा काळा रंग बॉलिवूडमघध्ये चालणार नाही, असे बोलले जात होते. मी विचार करायचो काय करु, मी देवाला म्हणायचो, अरे देवा, या रंगाचे काय करु, मी बदलू शकत नाही. म्हणून मला वाटले की मी माझ्या पायाने नाचू. मी माझ्या पायाने इतके नाचलो की लोक माझ्या पायाकडे लक्ष देत नाहीत. त्या दिवसापासून मी सेक्सी, डस्की, बंगाली बाबू झालो. 


मी देवाकडे खूप तक्रार करायचो. मात्र, आज हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी तक्रार करणे बंद केले. मी फक्त आभार मानले. मी नवीन लोकांना सांगेन की, कधीही धीर सोडू नका आणि स्वप्न पाहणे कधीही सोडू नका. स्वत झोपा पण स्वप्नांना कधीही झोपू देऊ नका. जसा मी बनलो तसे तुम्ही देखील बनू शकता.


70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी


70 वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत प्रत्येक भाषेतील चित्रपट आणि कलाकारांचा समावेश आहे. 


सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - अट्टम (मळ्याळम)


सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - गुलमोहर


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सूरज बडजात्या (ऊंचाई)


सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (बॅकग्राऊंड) - एआर रहमान (पोन्नियिन सेल्वन 1)


सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार - कांतारा (ऋषभ शेट्टी)


राष्ट्रीय, सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट - कच्छ एक्सप्रेस (गुजराती)


सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - KGF चॅप्टर २


सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - पोन्नियिन सेल्वन १


सर्वोत्कृष्ट तेलुगु चित्रपट - कार्तिकेय २


सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - वाळवी


सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट - काबेरी अंतराधन


सर्वोत्कृष्ट तैवा चित्रपट - सिकाइसल


सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - सौदी वेलाक्का


सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट - इमुथी पुथी


सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी (कंतारा)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - नित्या मेनन (थिरुचित्रंबलम), मानसी पारेख (कच्छ एक्सप्रेस)


विशेष उल्लेख पुरस्कार – मनोज बाजपेयी (सर्वोत्कृष्ट अभिनेता – गुलमोहर)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - नीना गुप्ता(ऊंचाई)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पवन राज मल्होत्रा (फौजा, हरियाणवी चित्रपट)


सर्वोत्कृष्ट मेकअप - अपराजितो (सोमनाथ कुंडू)


सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन - अपराजितो (आनंद आध्या)


सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन - पोन्नियिन सेल्वन 1 (आनंद कृष्णमूर्ती)


सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - पोन्नियिन सेल्वन 1 (रवि वर्मन)


सर्वोत्कृष्ट बालकलाकार - श्रीपथ (मलिकापुरम)


सर्वोत्कृष्ट चित्रपट ॲनिमेशन-व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्रह्मास्त्र भाग १ (अयान मुखर्जी)


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) - बॉम्बे जयश्री (सौदी वेलक्का)


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) - अरिजित सिंग (केसरिया, ब्रह्मास्त्र)


सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार - प्रीतम (ब्रह्मास्त्र)


सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार – नौशाद सदर खान (फौजा-हरियाणवी चित्रपट)


सर्वोत्कृष्ट स्टंट नृत्यदिग्दर्शन - KGF चॅप्टर 2


सर्वोत्कृष्ट संपादन पुरस्कार – अट्टम (मळ्याळम)


सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - अपराजितो


सिनेमावरील सर्वोत्कृष्ट पुस्तक - किशोर कुमार: द अल्टीमेट बायोग्राफी (अनुराधा भट्टाचार्जी, पार्थिव धर)


विशेष उल्लेख (संगीत उल्लेख) - संजय सलील चौधरी


सर्वोत्कृष्ट कृती दिग्दर्शन पुरस्कार - KGF चॅप्टर 2 (अनबारीव)