COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : आज संध्याकाळी होऊ घातलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या वितरण सोहळ्यावर बहिष्काराचं सावट आलंय. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणार नसेल, तर पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा काही पुरस्कार विजेत्यांनी दिलाय. काल चित्रपट पुरस्कार  वितरण सोहळ्याची रंगीत तालीम झाली. त्यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ 11 पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्यात येणार असल्याचं पुढे आलंय. त्याचवेळी इतर पुरस्कार विजेत्यांना माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे नाराज झालेल्या काही विजेत्यांनी पुरस्कार सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रपतींच्या व्यस्त कार्यक्रमाचं कारण यासाठी देण्यात आलंय.


राष्ट्रपती व्यस्त


एकूण 75 पुरस्कारांचं वितरण आज संध्याकाळी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलंय.  राष्ट्रपती साडे पाच वाजता विज्ञान भवनात येतील. पण त्याआधीच बहुतांश पुरस्कारांचं वितरण स्मृती इराणी आणि त्यांच्याच राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.