`माझ्यामुळे Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाला`, Ajay Devgn चा दावा
`आरआरआर` या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला Oscar 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता. या गाण्यात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरणनं डान्स केला होता. तर या गाण्याला ऑस्कर मिळण्यासाठी अजय देवगण जबाबदार असल्याचे त्यानं म्हटलं आहे.
Natu Natu Won Oscar Because Of Ajay Devgn Actor Says : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी असून लवकरच त्याचा ‘भोला’ (Bhola) हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेत्री तब्बू मुख्य भूमिका साकारत आहेत. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेले अजय आणि तब्बू दोघे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ऑस्कर विजेता आरआरआरच्या नाटू नाटू गाण्याविषयी बोलताना माझ्यामुळे ऑस्कर मिळाला असं अजयनं वक्तव्य केलं आहे.
कपिलच्या शोचा एक प्रोमो सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत कपिल अजय, तब्बू आणि उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे कसे मनोरंजन करतो हे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांशी कपिल खूप गप्पा मारताना दिसतो. असंच कपिलनं अजय आणि तब्बूसोबत केलं आहे. अजय आणि तब्बूशी गप्पा मारत असताना कपिलनं अजयला ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याबाबत प्रश्न विचारला. कपिलच्या या प्रश्नावर मजेशीर उत्तर देत अजय देवगण म्हणाला, 'नाटू नाटू गाण्याला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला आहे.' हे ऐकताच तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक आवाक झाले. त्यानंतर अजय म्हणाला, 'जर मी नाटू नाटू गाण्यावर डान्स केला असता तर गाण्याला पुरस्कार मिळाला नसता' अजयच्या या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळेच हसू लागले होते.
दरम्यान, ‘आरआरआर’ हा चित्रपट गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर 2023 मध्ये बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. तर चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस राजामौली यांनी केलं.
हेही वाचा : Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?
अजयच्या भोला चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अजय आणि तब्बू व्यतिरिक्त मकरंद देशपांडे,दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. भोला हा चित्रपट 30 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अजयचा हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'कैथी' या तामिळ चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी रीमेक आहे. भोला या चित्रपटात अशा व्यक्तीची कहाणी दाखवण्यात येणार आहे जो 10 वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर त्याच्या मुलीला भेटतो आणि मग त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो.