`नवरी मिळे हिटलरला` मालिकेतील अभिनेत्रीच्या आईचे निधन, म्हणाली `मी तुला वचन देते आई...`
धनश्री भालेकरच्या आईचे 18 एप्रिलला निधन झाले. तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Dhanashree Bhalekar Mother Death : झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत फाल्गुनी हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या आईचे निधन झाले आहे. मराठी अभिनेत्री धनश्री भालेकरने एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. यावेळी धनश्री भालेकर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
धनश्री भालेकरची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिने आईच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. पण अखेर तिच्या आईची मृत्यूची झुंज अपयशी ठरली. धनश्री भालेकरच्या आईचे 18 एप्रिलला निधन झाले. तिने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
धनश्री भालेकर आईच्या आठवणीत भावूक
"आई... I miss you अगं. आज 8 दिवस झाले पण मला अजूनही हे मान्यच करता येत नाहीये की तू आमच्यात नाही आहेस. I need you the most, खूप एकटी पडले आहे ग मी आई. माझ्याशी बोलायला, share करायला कोणीच नाहीय, मला हवी आहेस तू, मी नाही राहू शकत आहे तुझ्याशिवाय. तुझं नसणं म्हणजे माझ्यामध्ला एक भाग वगळल्यासारखं आहे.
माझ्या आयुष्यातलं motivation हरवलं आहे, Incomplete feel करते आहे खुप. किती particular असतं तुझं सगळं, तुझं perfection आणि super hygiene खुप miss करते मी. मला तुझ्याबरोबर खूप बोलायचं आहे, मी सगळं कोणाला सांगू, कोणाबरोबर गप्पा मारत बसू ? असं वाटतंय तू आहेस cricket match बघताना खुश होशील, सगळ्या serial च्या stories सांगशील मला घरी आल्यावर. Kitchen मध्ये आहेस, येशील माझा favourite पदार्थ बनवून आणि मी बाहेरुन घरी आल्यावर देशील मला खायला, घराबाहेर पडताना bye करायला दाराबाहेर आणि खिडकीत येशील.
मला खुप आठवण येते आहे ग तुझी, blank झाले आहे मी, तुझ्याशिवाय काय करावं सुचत नाही आहे... मला माहिती आहे तू ऐकत आहेस, बघत आहेस, तुझा लक्ष आहे माझ्यावर. मी promise करते आई तुला दिलेले commitments आणि तू पाहिलेली स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. तू आता जिथे आहेस तिथून मला आशीर्वाद दे आणि तू तूझी काळजी घे आणि प्रत्येक जन्मात माझी आई म्हणून तूच ये. खुप खुप प्रेम. Love you आई", असे धनश्री भालेकरने म्हटले आहे.
दरम्यान धनश्री भालेकर ही सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत झळकत आहे. यात ती फाल्गुनी हे पात्र साकारले आहे. या मालिकेमुळेच ती घराघरात पोहोचली. धनश्रीने मराठीसह हिंदी मालिकेतही काम केले आहे. माझी तुझी रेशीमगाठ, तुझेच मी गीत गात आहे, मेरे साई, सोनी भाग रही है, त्रिदेवीयां अशा मालिकांमध्ये ती झळकली.