Navra Maza Navsaacha 2 : तब्बल 19 वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या 'नवरा माझा नवसाचा' या एव्हरग्रीन चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाचा सिक्वल येणार हे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. तेव्हा पासून प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरतेनं प्रतीक्षा लागली आहे. काही दिवसांपूर्वी  सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला. काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाचा टीझर पाहता त्यावर दाखवण्यात आलं आहे की 19 वर्षानंतर आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला. तर गेल्या वेळी बसनं झालेला हा प्रवास आता रेल्वेनं होणार आहे. यावेळी ते गणपतीची मुर्ती घेऊन जातात तर अचानक ती मूर्ती ही गायब होते. त्यानंतर पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आता या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी दिसणार आहे. हेमल आणि स्वप्नील हे सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. 


'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती 


सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि  सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.


हेही वाचा : Stree 2 Twitter Review : स्त्री आणि सरकटाने थरकाप उडवला, स्टार कलाकारांच्या सरप्राईज एंट्रीने चाहत्यांना सुखद धक्का


'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आवडतो. त्यामुळे आता 'नवरा माझा नवसाचा 2' मध्ये काय धमाल अनुभवायला मिळणार याची प्रेक्षकांना कमालीची  उत्सुकता आहे. या टीजर मधून चित्रपटाच्या कथानकाविषयी थोडासा अंदाज बांधण्यात येत असून 80 कोटीचे हिरे आता 800 कोटीचे झाले आहेत. त्यामुळे हा मनोरंजक प्रवास अनुभवण्यासाठी आता प्रेक्षकांना केवळ 20 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.