‘नवरा माझा नवसाचा 2’ ची थेट `स्री-2`ला टक्कर! विकेण्डला केली `इतक्या` कोटींची कमाई
Navra Maza Navsacha 2 : `नवरा माझा नवसाचा 2` हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
Navra Maza Navsacha 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील आयकॉनिक ठरलेला चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतीक्षा करत होते. तब्बल 19 वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्या दिवशी मिळालेल्या प्रतिसादानं मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासातील सर्वात मोठा ओपनिंगपैकी एक आहे. या शोनं पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यास सुरुवात केली आहे.
सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 1.85 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी अर्थात विकेंड सुरु होताच शनिवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. या चित्रपटानं 2.5 कोटींचं कलेक्शन केलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे आणि विकेण्डला या चित्रपटानं 7.84 कोटींची कमाई केली आहे. 1000 पेक्षा अधिक शोजनं या चित्रपटाची सुरुवात झाली.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची निर्मिती, कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. तर संवाद लेखन हे संतोष पवार यांनी केले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे यांच्यासह मोठी स्टारकास्ट आहे. नवस फेडण्यासाठी जातानाचा रेल्वे प्रवास, त्यात होणाऱ्या गमतीजमती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. तर यावेळी चित्रपटातील सोनू निगम, जॉनी लिवर, श्रिया पिळगांवकर हे सेलिब्रिटी पाहुण्या कलाकराच्या भूमिकेत दिसून आले आहेत. इतकंच नाही तर प्रेक्षकांना हे सरप्राइज प्रचंड आवडलं आहे. बऱ्याच दिवसांपासून रसिक प्रेक्षकांमध्ये 'नवरा माझा नवसाचा 2' हा चित्रपट चर्चेत राहिला आणि त्याचंच प्रतिबिंब बॉक्स ऑफिसवरही उमटत आहे. चित्रपटावरचं प्रेम प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिसादातून दाखवून दिलं आहे. आता येत्या काही दिवसांत हा प्रतिसाद आणखी वाढेल यात शंका नाही.
हेही वाचा : राहाला मल्याळम अंगाई गाऊन झोपवतो रणबीर; आलियानं सांगितला किस्सा, कारणही आहे रंजक
या चित्रपटातील स्टार कास्टविषयी बोलायचे झाले तर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सुप्रिया पिळगावंकर आणि हेमल इंगळे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.