Navya Naveli Nanda on Trolling Over IIM Ahmedabad Admission : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या आयआयएम अहमदाबादमधल्या प्रवेशामुळे चर्चेत आहे. ज्यानंतर काही लोकांनी तिची स्तुती केली तर काहींनी तिला ट्रोल केलं. आता नव्यानं या सततच्या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या नवेली नंदानं नुकत्याच एका इन्टरॅक्शन दरम्यान, यावर मौन सोडलं आहे. खरंतर, नव्यानं नुकतीच इंडिया टूडे मुंबई कॉन्क्लेव 2024 मध्ये हजेरी लावली होती. नव्यानं ‘बियॉन्ड द लिगेसी: जेन जेड फॉर ए जस्ट’ च्या एका सत्रा दरम्यान, तिचे विचार मांडले होते. त्या दरम्यान, तिनं सोशल मीडियामुळे मिळालेल्या संधीसाठी आभार मानले आणि त्यामुळे येणाऱ्या सगळ्या आव्हानानां स्वीकारले. 



दरम्यान, यावेळी स्वत: चे विचार मांडत नव्यानं म्हटलं की 'सोशल मीडिया एक चांगलं प्लॅटफॉर्म राहिलं आहे. कारण त्यामुळे अनेक लोक ज्यांना कधी कोणती संधी मिळाली नाही, ते लोक समोर येऊन त्यांचं मत मांडू लागले आहेत. तर भारत देखील त्यापैकी एक आहे आणि आयआयएम अहमदाबादचा भाग होणं ही अविश्वसनीय गोष्ट आहे. मी जगातील काही उत्तम शिक्षकांच्या मार्गदर्शनात उच्च शिक्षण घेणार असल्यानं स्वत: ला भाग्यवान समजते.'


सोशल मीडियावर मिळणारा फीडबॅकवर नव्या नवेलीनं म्हटलं की 'मी कधीच सोशल मीडियावर मिळणाऱ्या फीडबॅकवर नाराज होत नाही. मी लोकांसाठीचं तर काम करते, तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या फीडबॅकनं नाराज का होईन. मी तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या फीडबॅकवर काम करते जेणेकरून मी एक चांगली व्यक्ती होऊ शकेल.'


नव्यानं मुलाखती दरम्यान सांगितलं की 'तिचं कुटुंब तिच्या प्रत्येक क्रेझी आयड्याला पाठिंबा देतं आणि जेव्हा त्यानं पॉडकास्टविषयी सांगितलं तर पहिल्या दिवसापासून सगळे तिच्यासोबत होते.' तिनं पुढे हे देखील सांगितलं की 'ती स्वत: ला भाग्यशाली समजते की तिची आई आणि आजी तिच्या पॉडकास्टचा भाग होण्यासाठी तयार झाल्या.' 


हेही वाचा : Dharamveer 2 : रुपेरी पडद्यावर झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सोशल मीडियावर एकच चर्चा


सतत होणाऱ्या सोशल मीडिया ट्रोलिंगवर नव्या नवेली म्हणाली, 'मी या गोष्टीवर जास्त लक्ष देत नाही की ट्रोल्स काय करते. मी फक्त पॉझिटिव्ह फीडबॅकवर लक्ष देत आणि कायम फीडबॅकवरून काही शिकण्याचा प्रयत्न करते.' तिचं म्हणणं आहे की 'मी ही गोष्ट मान्य करते की मी एक अगदी वेगळ्या वास्तविकतेतून येते. लोकांकडे त्याविषयी बोलायला खूप काही असेल. खरंतर, तिनं या गोष्टीवर जोर दिला की ती तिच्या खासगी आयुष्यावर आणि कामावर लक्ष केंद्रित करते आणि तिची सध्याची जबाबदारी ही तिच्या कामावर आणि स्वत: ला अजून कसं चांगली व्यक्ती बनवू शकतो याकडे आहे.'