Kareena Kapoor and Navya Naveil Nanda Same Dress: सेलिब्रेटींच्या फॅशनची सोशल मीडियावर जोरात चर्चा ही रंगलेली असते. त्यातून कोणी कधी कोणती फॅशन फॉलो केली याकडेही त्यांचे लक्ष असते. सध्या करीना कपूरसोबत अमिताभ बच्चन यांची नातं नव्या नवेल नंदाची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. 1 नोव्हेंबरला जिओ वर्ल्ड प्लाझाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तेव्हा यासाठी बॉलिवूडचे अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. करीना कपूरच्या गोल्डन स्टाईलचा ड्रेस घातला होता. तिच्या या ड्रेसची जोरात चर्चा होती. परंतु तिच्यासारखाच ड्रेस हा नव्या नवेली नंदानं म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या नातीनं घातल्यानं नेटकरी तिला कॉपीकॅट म्हणून ट्रोल करू लागले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची जोरात चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा सेलिब्रेटींचे लुक्स हे एकत्र मॅच होताना दिसतात. त्यावरून मग सोशल मीडियावर त्यांना कॉपीकॅट म्हणून हिणवलं जाते. सध्या करीना कपूर आणि नव्या नवेली नंदासोबत असंच काहीसं झालं आहे. त्यांच्या लुकची तर जोरात चर्चा रंगलेली आहे परंतु यावेळी त्यांना फार ट्रोलही करण्यात आलं आहे. यावेळी त्या दोघींचाही पॅटर्न हा फारच सारखा होता. त्याचसोबत त्यांच्या ड्रेसची एमब्रोयडरीही काही प्रमाणात सारखी होती. यावेळी शिमर आणि गोल्डन लुकचा त्यांचा हा ड्रेस होता. करीना आणि नव्यानं यावेळी ब्लिंगी ड्रेस परिधान केला होता. दोघींच्या ड्रेसमधील ही साम्यता काहींना खटली आहे तर काहींना आवडली नाहीये. सध्या यामुळे त्या दोघांचीही जोरात चर्चा आहे. यावेळी नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत.



नव्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून आपले हे क्लासी फोटोज पोस्ट केले आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्याखाली तिनं करिनाला कॉपी केल्याचे म्हटले आहे. अनेकांनी ओळखलंय की हा ड्रेस करिनानं परिधान केला होता. तिच्या या पोस्टखाली अनेक लागोपाठ त्याच कमेंट केल्या आहेत. त्यामुळे नव्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 



नव्या नवेली नंदा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यातून ती स्वत:चे पोडकास्टही चालवते. त्यामुळे तिची जोरात चर्चा असते. महिलांच्या आरोग्याशी निगडित ही एक स्टार्टअपही चालवते. त्यातून ती जाहिरातींमध्ये आणि इतर बॉलिवूडच्या कार्यक्रमांना दिसते परंतु ती अभिनयात सक्रिय नाही. तिचा भाऊ अगस्त्या नंदा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यावेळी त्याची जोरात चर्चा आहे.