`गांजा घेतल्यानंतर मला चांगलं वाटतं`; नवाजुद्दीन सिद्दीकीचा व्यसनाविषयी खुलासा, `स्वानंद किरकिरेनं मला एकदा...`
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या व्यसनाविषयी सांगितलं आहे.
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या हटके आणि दर्जेदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाच्या जोरावर नवाजुद्दीन सिद्दीकीनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. त्यातही बॉलिवूड हे असं विश्व आहे ज्याविषयी आपल्या जास्त काही माहित नसतं. त्याविषयी आपल्याला सेलिब्रिटी किंवा तिथल्या काही लोकांकडून माहित मिळते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनं देखील असेच काही खुलासे केले आहेत. त्याशिवाय त्याच्या खासगी आयुष्यावर देखील त्यानं अनेक खुलासे केले आहेत. त्यात त्याचं व्यसन देखील आहे.
नवाजुद्दीननं ही मुलाखत 'समदीश अनफिल्टर्ड शो'ला दिली होती. या मुलाखतीत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मानधनाविषयी बोलल्यानंतर नवाजुद्दीन त्याच्याविषयी बोलला. नवाजुद्दीननं सांगितलं की 'मी नेहमीच व्यसन करतो असं नाही आणि जरं मी कधी केलं तर ती फार कमी प्रमाणात असतं.' यावेळी त्याच्या पहिल्यांदा दारू पिण्याचा किस्सा सांगत नवाजुद्दीन पुढे म्हणाला, 'मी सगळ्यातं पहिल्यांदा व्यसन हे NSD मध्ये असताना केलं होतं. आमचा प्रयोग संपल्यानंतर आम्ही सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. सगळ्यांनी बिअर आणली होती आणि त्याआधी मी कधीच प्यायलो नव्हतो. तर प्रयोगातच पहिल्यांदा सिगारेट ओढली होती.'
आवडत्या सनाविषयी सांगताना नवाजुद्दीन म्हणाला, 'होळी हा माझा आवडता सण आहे. त्याचं कारण म्हणजे तेव्हा मला थंडाई प्यायला मिळते. स्वानंद किरकिरेनं मला थंडाई प्यायला दिली आणि मग मी पीतच राहिलो. काही वेळानंतर मला काय होतंय हे मला कळतच नव्हतं. मग काय दोन दिवस माझी नशा उतरलीच नव्हती. मग मी आधीसारखा नॉर्मल झालो. मात्र, थंडाई प्यायल्यानंतर मी महान अभिनेता आहे असं मला वाटत होतं.'
पुढे गांजा घेतल्यानंतरचा किस्सा सांगत नवाजुद्दीनं म्हणाला, 'गांजा घेतल्यानंतर मला चांगलं वाटतं. मला खूप मज्जा येते. मी गाणं गायला सुरु केल्यानंतर काहीतरी वेगळंच होऊ लागतं.'
हेही वाचा : Animal ओटीटीवर येताच चाहते संतापले! निर्मात्यांकडे केली 'ही' मागणी
दरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो लवकरच 'सेक्शन 108' या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अरबाज खान आणि रेजिना कैसेंड्रा हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाविषयी सांगायचे झाले तर आपल्याला यात मिस्ट्री थ्रिलर ड्रामा पाहायला मिळणार आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.