मुंबई : आत्मचरित्राबाबत झालेल्या वादानंतर अखेर अभिनेता नवाजुद्दीननं सिद्दीकीनं त्याचं पुस्तक मागे घेतलं आहे. याबाबतची घोषणा नवाजुद्दीननं ट्विटरवर केली आहे. माझ्या आत्मचरित्रामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो. दिलगिरी व्यक्त करून मी माझं आत्मचरित्र मागे घेत आहे, असं ट्विट नवाजुद्दीननं केलं आहे.



काय होतं नवाजुद्दीनच्या पुस्तकात ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायोग्राफीमध्ये आपल्या आयुष्यासंबंधी अनेक गुपीते उघड केली आहेत. त्यात त्याने आपल्या लव  लाइफबद्दलही काही गोष्टींचा उल्लेख केला आहे.


त्याने आपल्या पुस्तकात खूप उघडपणे आपल्या प्रेसयींच्या शरीराप्रती होणाऱ्या आकर्षणाबद्दल बोलले आहे. नवाजने आपल्या पुस्तकात लिहिले की कशी सर्वात प्रथम त्याच्या आयुष्यात सुनीता आली. त्यानंतर त्याचे न्यूजर्सीच्या सुजैनशी सूत जुळले.


मिस लवलीच्या को-स्टावर जीव जडला


त्यानंतर त्याच्या प्रेमाची गाडी इथेच थांबली नाही.  त्यानंतर 'मिस लवली'च्या शुटींगवेळी नवाजला आपली को-स्टार निहारिका सिंह हिच्यावर जीव जडला होता.  या चित्रपटाची शुटींग सुरू होती त्यावेळी मला वाटले की ती कोणत्यातरी गोष्टीने माझ्याशी नाराज आहे.  ती एकटी एकटी आणि नाराज राहायला लागली. मी तिला अनेकवेळा ही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तीने काहीच सांगितले नाही. मग मी एक दिवशी तिला घरी मटण खाण्यासाठी आमंत्रित केले. ही माझी खासियत आहे, मला खूप चांगले मटण करता येते. तीने मान्य केले. तीने मटण खाले आणि माझी प्रशंसाही केली. त्यानंतर तीने मला घरी आमंत्रीत केले आणि म्हटले नवाज माझ्या घरी ये, मी तुझ्यासाठी मटण तयार करेल.


निहारिकाच्या घऱी गेलो आणि...


मी निहारिकाच्या घरी गेलो, दरवाजा उघडल्यावर मेणबत्त्या जळत होत्या. मी ठरलो गावठी... मी सरळ तिला आलिंगन मारले आणि तिला बेडरूमध्ये घेऊन घुसलो, त्यानंतर आम्ही खूप प्रेम केले. त्यानंतर निहारिका आणि माझे संबंध सुरू झाले, असा उल्लेख नवाजने केला आहे. असे नाते जे माझ्या कल्पनेच्या पलिकडे होते, ते दीडवर्ष चालले.


दरम्यान, हे सुरू असताना सुजैन मला मेल पाठवायची, या गोष्टीबद्दल निहारिकाला माहिती झाले आणि सुजैन आणि नवाजचे संबंध संपले.


मी स्वार्थी होतो... मला हवे होते...


नवाज पुढे लिहतो, सर्व मुलींप्रमाणे निहारिकाचीही इच्छा होती की मी तिच्याशी गोड गोड गोष्टी कराव्यात. जशा एखादा प्रियकर करतो, पण मी स्वार्थी होतो. मी तिच्या घऱी एकाच कारणासाठी जायचो, ती होती निहारिका... केवळ गरज म्हणून मी तिच्याकडे जायचो.


एकदा तिच्या घरी गेलो तरी तिने सिल्क रोब परिधान केला होता. मी तिच्या बगलेत हात टाकला, तेव्हा ती बोलली नाही नवाज आता मी तुला पुन्हा भेटणार नाही. तिच्या या गोष्टीने मी घाबरलो. मी रडायला लागलो. तिची विनवणी करायला लागलो. पण ती आपल्या निर्णयावर कायम होती.


मला नाही माहिती की यानंतर माझ्या आयुष्यात कोणती मुलगी येईल की नाही, आम्ही लग्न करू ती माझी बायको बनेल, असेही म्हटले आहे.


सुनिता राजवर यांचा पलटवार


नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत थिएटरमध्ये कलाकार म्हणून काम करणाऱ्या सुनीता राजवार यांनी नवाजुद्दीनला 'हीन प्रवृत्तीचा व्यक्ती' म्हटलंय. शुक्रवारी एक फेसबुक पोस्ट लिहून 'नवाजुद्दीन तुला महिलांचा मान राखत येत नाही' असं त्यांनी म्हटलंय.


सुनीता राजवार यांनी नवाजुद्दीनसोबत थिएटरमध्ये काम केलंय. नवाजुद्दीननं ' An Ordinary Life: A Memoir' या पुस्ताकात सुनीता यांचा उल्लेख आपलं पहिलं प्रेम म्हणून केलाय. नवाजनं आपल्या या पुस्तकात केवळ सुनीता नाही तर आपल्या अनेक अफेअर्सचा खुलासा केलाय. यामध्ये त्याच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रींपासून हॉटेलच्या वेट्रेसपर्यंत अनेक महिलांचा समावेश आहे.


सुनीता यांनी केवळ आपण गरीब असल्यानं आपल्याला नाकारलं असंही नवाजुद्दीननं आपल्या पुस्तकात म्हटलंय. बेरोजगार असल्यानं सुनीता आणि माझं ब्रेकअप झालं... यावेळी आपल्या मनात आत्महत्येचेही विचार येऊन गेले. यानंतर आपला प्रेमावरचा आणि महिलांवरचा विश्वास उडाला... असंही नवाजुद्दीननं म्हटलंय.


पण, 'कहते हैं नसीब वक्त बदल सकता है, इंसान की फितरत नहीं' असं म्हणत सुनीता यांनी नवाजुद्दीनचे सगळे दावे फेटाळून लावलेत. एका फेसबुक पोस्ट द्वारे त्यांनी 'मी तुला तुझ्या गरीबीमुळे नाही तर तुझ्या गरीब विचारांमुळे सोडलं होतं... तू तुझ्या आत्मचरित्रातून दाखवून दिलंस की मी ज्या नवाजुद्दीनला ओळखत होते त्यापेक्षा तू खूपच गरीब आहेस... तुला महिलांचा आदर करणं ना तेव्हा जमलं ना आत्ता तू काही शिकला... तुम्हारे हालात पर बस इतना ही कहुंगी, जा, तू शिकायत के काबिल होकर आ, अभी तो मेरी हर शिकायत से तेरा क़द बहुत छोटा है' असं सुनीता यांनी म्हटलंय.