प्रियकरासोबत अभिनेत्रीचे खास क्षण; Private फोटो व्हायरल होताच बसला धक्का
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. या लेडी सुपरस्टारने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण अनेकवेळा नयनतारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. याच कारणामुळे तिला कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन असंही म्हटलंही जातं. अनेक अभिनेत्यांसोबतच्या रिलेशनशिपपासून ते तिचा प्रियकर सिम्बूसोबतचे इंटिमेट फोटो लीक होण्यापर्यंत, नयनताराला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. जे फोटो पाहून चाहत्यांनाही धक्का बसला होता. या दोघांची भेट 'वल्लवन' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. येथूनच त्यांची जवळीक वाढली. मग दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर या दोघांचे इंटिमेट फोटो व्हायरल झाले होते. सिम्बूनंतर नयनतारा प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि अभिनेता प्रभुदेवासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती.
नयनताराचं कोरिओग्राफर प्रभुदेवासोबत अफेअर होतं. त्यावेळी प्रभुदेवा विवाहित होता आणि त्याला तीन मुलं होती. नयनतारा आणि प्रभुदेवा एकमेकांच्या प्रेमात इतके वेडे झाले होते की, ते लिव्हनमध्ये राहू लागले. नयनतारानेही त्याच्या प्रेमात तिचा धर्म बदलला.
नयनताराचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला होता मात्र प्रभू देवासोबत लग्न करण्यासाठी तिने 2011 मध्ये हिंदू धर्म स्वीकारला. नयनतारासाठी, प्रभुदेवाने त्यांचं 16 वर्षांचं लग्न तोडलं, त्यानंतर त्यांची पत्नी लताने त्याला घटस्फोट दिला. मात्र त्यानंतरही नयनतारा आणि प्रभुदेवाचं लग्न झालं नाही. या दोघांच ब्रेकअप झालं.