मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार नयनताराने विघ्नेश शिवासोबत लग्न केलं. (Nayanthara-Vignesh Shivan Wedding). या दोघांच्या लग्नाबाबत त्यांचे फॅन्स खूप उत्सुक होते आणि आता अखेर त्यांच लग्न झालं. नयनतारा सध्या तिच्या नवविवाहित आयुष्याचा आनंद घेताना दिसत आहेत. लग्नानंतर नयनतारा पती आणि फिल्ममेकर विघ्नेश शिवनसोबत हनीमून एन्जोय करत आहे. विघ्नेशने नयनतारासोबत एक फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 
 
विघ्नेशने फोटो पोस्ट करताचं फक्त चाहत्यांनीचं नाही, तर अनेक सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सध्या नयनताराचा पतीसोबत फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पाहा फोटो... 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर नयनताराने घेतला मोठा निर्णय
नयनतारा सिनेमांमधील इंटिमेट सीनपासून दूर राहणार आहे. नयनताराने लग्नानंतर अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रीन रोमँटिक सीन न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


नयनतारा आगामी 'जवान' सिनेमामध्ये किंग खान म्हणजे शाहरुख खानसोबत दिसणार आहे. शाहरुख खान सिनेमांमध्ये इंटिमेट सीन्स करणं टाळतो.  त्यामुळे सिनेमात नयनतारा आणि शाहरुखचे इंटिमेट सीन नसतील. 


नयनताराच्या लग्नाबद्दल सांगायचं तर, 9 जून रोजी अभिनेत्रीने चित्रपट निर्माता विघ्नेश शिवनसोबत लग्न केल. मोठ्या थाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. नयनताराच्या लग्नात रजनीकांतपासून शाहरुख खानपर्यंतचे बडे सेलिब्रिटी स्पॉट झाले.