मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्री आई होत आहेत, काही अभिनेत्री प्रेग्नेंट (Actress Pregnant) आहेत, तर काही अभिनेत्रींनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यात आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गोंडस जुळ्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळांचे फोटो शेअर करून तिने याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साऊथची सुपरस्टार नयनतारा (nayanthara) लग्नाच्या चार महिन्यांनंतरच आई झाली आहे. नयनताराने (nayanthara)  जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. याबाबत अभिनेत्रीचा पती विघ्नेश शिवनने (vignesh shivan) मुलांसोबतचे फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली आहे. शिवनने स्वतःचे आणि पत्नी नयनताराचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते दोघेही दोन्ही मुलांच्या पायाचे चुंबन घेताना खूप आनंदी दिसत आहेत.


फोटो शेअर करत विघ्नेश शिवनने (vignesh shivan)  लिहिले की, 'नयन आणि मी आज अम्मा आणि अप्पा बनलो आहोत. आम्हाला जुळे मुलगे झाले आहेत. आमच्या सर्वांच्या प्रार्थना, पूर्वजांच्या आशीर्वादाने आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रूपाने मिळाल्या आहेत. आम्हाला तुमच्या सर्व प्रार्थनांची गरज आहे. उईर (uyir) आणि उलगम (ulagam) असे या बाळांचे नाव असल्याची माहिती आहे.