मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर होत असलेल्या चौकशीच्या माध्यमातून बॉलिवूड विश्वातील अनेक सत्य बाहेर येत आहेत. सुशांत आत्महत्ये प्रकरणी एनसीबी सध्या बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन संबंधी तपास करत आहे. याप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला एनसीबी कोणते प्रश्न विचारू शकते, याची यादी झी न्यूजच्या हाती लागली आहे.  ज्यानंतर बॉलिवूडमधील अनेक गोष्टींचा खुलासा होवू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचे नाव ड्रग्स प्रकरणी समोर आले आहे. त्यामुळे एनसीबीने करिश्मा प्रकाशला देखील समन्स पाठवले आहे. मात्र ती चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली नसल्याची बाब समोर येत आहे.


सूत्रांच्या सांगण्यानुसार एनसीबीची टीम करिश्मला ड्रग्स प्रकरणी  १६ प्रश्न विचारू शकते.
- तुझ पूर्ण नाव काय? 


- क्वानमध्ये काम करण्यापूर्वी कोणत्या कंपनीमध्ये काम केलं होतं? 


- क्वानमध्ये केव्हा रूजू झाली होतीस? 


- क्वानमध्ये दीपिकाचं पीआर पाहण्याची जबाबदारी कोणी दिली होती? 


- दीपिका आणि तुझी पहिली भेट केव्हा झाली? 


- तुझ्याकडे दीपिकाने ड्रग्सची मागणी केली होती?  जर हो तर किती वेळा आणि कोणत्या प्रकारच्या ड्रग्सची मागणी केली? 


- कोणाच्या माध्यमातून तू ड्रग्स मागवत होतीस? 


- तु अनुज केसवानीला ओळखतेस? 


- तुला माहित आहे अनुज एक ड्रग्स पेडलर आहे? 


- अनुजने चौकशीदरम्यान तुझ्या नावाचा उल्लेख केला आहे? 


- अनुजबरोबरच्या तुझ्या संभाषणाचा पुरावाही आमच्या हाती लागला आहे.  


- ड्रग्स आणण्यासाठी तु अनुजला सांगायची?


- दीपिका आणि तुझे जे  चॅट समोर आले आहेत, ते तुमचे आहेत?


- दीपिकाने केव्हा-केव्हा ड्रग्सची मागणी केली? 


- दीपिका नेहमी ड्रग्सची मागणी करत होती? 


- चॅटमध्ये कोको रेस्टॉरंट्स बद्दल लिहिले आहे, त्या दिवशी तिथे काय झाले? त्या दिवसाचा घटनक्रम सांग.