मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांची `त्याला` पसंती
शरद पवारांनी दिलं मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे येत्या काळात मुख्यमंत्रीपदाची धुरा कोण सांभाळणार याविषयीची. एकिकडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातील विजयी उमेदवार आणि काही मोठ्या पक्षांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळ आणि सत्तास्थापनेसाठी चढाओढ सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी एका व्यक्तीच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठीची पसंती दिली आहे.
पवारांनी आता मुख्यमंत्रीपदासाठी ज्या व्यक्तीला आश्वासन दिलं, त्यामुळे सत्तास्थापनेची ही गणितं बदणार का असाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? या प्रश्नाची उकल करण्यासाठी तर्क लावण्यास सुरुवात होण्यापूर्वीच इथे एक लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे त्यांनी एका बालगायकाला मुख्यंत्रीपदासाठी पसंती दिली आहे.
'झी युवा' वाहिनीवरील 'युवा सिंगर एक नंबर' रिऍलिटी शो चा महाअंतिम सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं चित्रीकरण नुकतच नुकतेच बारामतीच्या गदिमा सभागृहात पार पडला. दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रम शारदोत्सव मध्ये शरद पवारांच्या उपस्तिथीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ओंकार कानिटकर, जगदीश चव्हाण, दर्शन-दुर्वांकुर, पूजा-पल्लवी, अनिमेश ठाकूर आणि एम एच फोक बँड हे ६ अंतिम प्रतिस्पर्धी होते.
अतिशय उत्साहात सुरु असणाऱ्या या कार्यक्रमाच्या एका ऍक्टमध्ये बालगायक ओंकारने शरद पवारांकडे एक वेगळीच मागणी केली. ओंकारने महाअंतिम सोहळ्यात एक ऍक्ट सादर केला. ज्यामध्ये तो राजकारणी नेता बनून आला होता.
बारामतीमधील राजकीय हवामानाने त्यालाही स्फुरण चढले आणि त्याने कार्यक्रमाची निवेदिका मृण्मयी देशपांडे हिला सांगितले मी आज नुसत्या राजकारणी नेत्याच्या वेशात नाही आहे, तर मलाही मुख्यमंत्री व्ह्यचंय.
ओंकारच्या या वक्तव्यानंर सभागृहात एकंच हशा पिकला. बरं तो एवढंच म्हणून थांबला नाही तर "मी मुख्यमंत्री होणार, पण मला मुख्यमंत्री बनवणार ते पवार साहेब'' असंही म्हणाला. यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मग काय, त्याने थेट शरद पवारांना उद्देशून 'कराल ना हो मला मुख्यमंत्री?', असा प्रश्न केला.
पवारांच्या या वक्तव्यावर कार्यक्रमात उपस्थित सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले त्यातील सर्वात युवा मुख्यमंत्री हा राज्यातून आणि देशातून बारामतीने दिला आहे. त्यामुळे भविष्यात ओंकारसुद्धा मुख्यमंत्री होऊच शकतो." पवार कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याती हा एक किस्सा. पण, असे बरेच अविस्मरणीय क्षणही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांना अनुभवता आले. जे पाहण्याची संधी आता प्रेक्षकांनाही मिळणार आहे.