Neelam Kothari on First Meeting With Govinda : बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारी सध्या 'फॅब्युलस लाइफ वर्सेस बॉलिवूड वाइव्स'मध्ये दिसते. हा 'फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स' या सीरिजचा 3 रा भाग आहे. त्या सीरिजमध्ये दिसणाऱ्या सगळ्या सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य पाहायला मिळत आहे. दरम्यान, यामुळे नीलमविषयी सतत सोशल मीडियावर काही ना काही गोष्टी चर्चेत येतात. त्यापैकी एक आहे अभिनेता गोविंदा सोबतचं तिचं नातं. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नीलमं गोविंदासोबत तिची पहिली भेट कशी होती. त्या दोघांचं नातं कसं होतं आणि आमिरसोबतच्या कोलॅबरेशनविषयी सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीलमनं ही मुलाखत 'रेडिओ नशा'ला दिली होती. त्यावेळी गोविंदा आणि तिच्या पहिल्या भेटीविषयी सांगताना नीलम म्हणाली, तो आला आणि मला हॅलो म्हणाला. तो मग हिंदीमध्ये बोलू लागला. तेव्हा मला वाटलं की अच्छा आता थोडी अडचण येऊ शकते कारण मी फक्त इंग्रजीमध्येच बोलायचे आणि तो हिंदीमध्ये. आम्ही दोघं जेव्हा एकमेकांशी बोलायचो तेव्हा ते पाहणं कोणासाठी विनोदी असेल. पण मी काय बोलते हे त्याला कळायचं आणि तो काय बोलतोय हे मला कळायचं. 


नीलमनं पुढे सांगितलं की 'जर आमच्या डान्स स्टेपविषयी बोलायचं झालं तर जे गाणं असायचं त्यावरून आमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन असायचं की कोण चांगला डान्स करेल? मला त्याच्यापेक्षा चांगला डान्स करायचा असायचा आणि त्याला माझ्या पेक्षा चांगला डान्स करायचा असायचा. तर प्रेक्षकांना हे आवडलं.' 


याशिवाय मुलाखतीत नीलमनं आमिरसोबत तिच्या कोलॅब्रेशनला घेऊन चर्चा केली. दोघांनी एकत्र 'अफसाना प्यार का' या चित्रपटात काम केलं. त्या आठवणींना उजाळा देत नीलम म्हणाली, 'आमिरसोबत काम करायला खूप मज्जा आली. तो त्याचे सीन आणि परफॉर्मेसेस कसा होतोय याकडे खूप लक्ष द्यायचा. तो म्हणायचा की आणखी एक शॉट देऊया आणि याचं एकमेव कारण म्हणजे तो त्याच्या कामाला घेऊन परफेक्ट होता.'


हेही वाचा : 'मी रवीना टंडनसारख्या लोकांशी कधीच बोलणार नाही...'; 'या' कारणामुळे अमृता सिंगनं अभिनेत्रीला केली शिवीगाळ
 
नीलमच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिनं सगळ्यात आधी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या कसम या चित्रपटातून ती सगळ्यात शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फॅब्युलस लाइफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स' या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.