Neena Gupta On Working In Bollywood : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. नीना यांनी त्याच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नीना या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नीना या नेहमीच स्पष्ट वक्तव्य करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा वध हा चित्रपट प्रदर्शित झाला. या दरम्यान, नीना यांना 40 वर्षांच्या करिअरनंतरही त्यांना काम मिळणं कठीण जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीना यांनी बॉलिवूडमध्ये स्वत: चे स्थान मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले आहे. याविषयी नीना या त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. नीना यांनी 'डीएनए'ला मुलाखतीत दिली होती, यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीत काम मिळण्याविषयी सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की वाईट प्रसंग किंवा काळ हा माणसाला मजबूत बनवतो, पण प्रत्यक्षात मी फारशी मजबूत नाही. मी माझ्या अटींवर आयुष्य जगते असे लोक म्हणतात, पण खरं हे आहे की माझ्या आयुष्यात मला त्याग आणि तडजोड करावी लागेल.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'खऱ्या आयुष्यात मी खूप लाजाळू आहे. आजही मला माझ्या मित्रांच्या मदतीनं कोणतेही काम मिळत नाही. लाजाळू असल्यामुळे मी त्यांच्याकडे काम मागू शकत नाही. कठीण प्रसंग येतो तेव्हा स्त्रिया या बलवान होतात, नाहीतर कमकुवत होतात. त्यामुळे माझ्यामते कठीण परिस्थितीत तुम्ही स्वत: ला सांभाळून घेतलं पाहिजे आणि अशा कठीण प्रसंगाचा सामना केला पाहिजे.'


हेही वाचा : Priyanka Chopra ला ब्रालेस टॉप परिधान करणं पडलं महागात, Oops Moment पासून वाचण्यासाठी करत होती 'हे' काम


दरम्यान, काही दिवसांपूर्वी नीना गुप्ता यांनी एक मोठा खुलासा केला होता. नीना यांनी 'कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी एक खुलासा केला आहे. कपिलनं नीना यांना प्रश्न विचारला की 'तुम्हाला ‘बेवॉच’ चित्रपटात पामेला एंडरसनची भूमिका साकारायची होती.' यावर नीना या कपिलला उत्तर देत म्हणाल्या, 'अरे माझे बूब्स इतके मोठे नाही मग कसं करणार.' नीना यांनी दिलेलं उत्तर ऐकूण तिथे उपस्थित असलेले सगळे प्रेक्षक हसू लागतात. 


दरम्यान, नीना या सगळ्यात शेवटी 'गूडबाय' या चित्रपटात दिसल्या. या आधी त्या सरदार का '83', ‘ग्रॅंड सन’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या. या व्यतिरिक्त त्यांनी ‘मसाबा मसाबा’ आणि 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये ही काम केले आहे.