अभिनेत्री नीना गुप्ता यांची प्रकृती बिघडली, चाहत्यांची चिंता वाढली
नीना गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की....
Neena Gupta Dental Treatment Video : सिनेविश्वातील जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी 'बधाई हो' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं. नीना गुप्ता सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या नेहमी त्यांच्या चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसतात. त्यांच्या चाहत्यांची संख्यादेखील फार मोठी आहे. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. खरंतर त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत दिसत आहेत.
नीना गुप्ता यांनी नुकतीच दातांच्या उपचारासाठी डेंटल क्लिनिकला भेट दिली. त्याच्यावर डेंटल क्लिनिकमध्ये उपचार झाले आहेत तिथून त्यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्या ऍनेस्थेशिया घेतल्यानंतर बोलताना दिसत आहे. मात्र, त्यांना तसं करण्यात अडचण येत आहे. यानिमित्ताने त्यांनी आपल्या डेंटिस्ट मैत्रिणीचीही ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे.
नीना गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझी खास डेंटिस्ट मैत्रिण शालिनी प्रधान.' व्हिडिओमध्ये नीना गुप्ता डेंटल चेअरवर पडलेल्या दिसत आहेत. तिने एप्रनही घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये नीना गुप्ता म्हणत आहेत की, ' मला अनेस्थेशिया झाला आहे, बघा माझी काय अवस्था आहे.' यावेळी नीना गुप्ता यांनी तिच्या मैत्रिणीचं कौतुकही केलं आहे.
त्या जास्त बोलू शकत नसल्याने व्हिडिओ मध्येच कट झाला आहे. मात्र चाहत्यांनी त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, 'तुमच्यावर आता उपचार झाले आहेत, तुम्ही लवकर बरं व्हावं, अशी माझी इच्छा आहे.' तर एकाने लिहिलं आहे की, 'तुम्ही डेंटल हॉस्पिटलमध्येही विशेषत: मेकअपशिवाय सुंदर दिसता.' त्याचबरोबर अनेकांनी त्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सूरज बडजात्याच्या सिनेमात नीना गुप्ता दिसल्या होत्या.
नीना गुप्ता नुकत्याच सूरज बडजात्या दिग्दर्शित 'उंचाई' चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नफिसा अली आणि परिणीती चोप्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. 'प्रेम रतन धन पायो'नंतर सूरज बडजात्याने पुन्हा एकदा एका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.