मुंबई : महेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्ट आता नीतू कपूर यांची सून झाली आहे. 14 एप्रिल रोजी, आलिया आणि रणबीर कपूर यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत एकमेकांचा हात धरला आणि 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन घेतलं. रणबीर आलियाच्या लग्नाने त्यांचे चाहते खूश आहेत. तर नीतू कपूरही खूप खूश आहे. लग्न झाल्यावर नीतूने आलियासमोर एक डिमांड केली आहे. आलियाने आता घर सांभाळावं, अशी नीतू कपूरची ईच्छा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या नीतू कपूर डान्सिंग रिअॅलिटी शो 'डान्स दीवाने ज्युनियर'मध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच शोमध्ये तिने रणबीर आणि आलियाच्या लग्नाबद्दल सांगितलं आणि म्हणाली की, आता तिला घरावर राज्य करायचं आहे. सुनेचं कौतुक करत नीतू कपूरने आलिया भट्टला बेस्ट म्हटलं.



नीतूने शेअर केला रॉयल पिक्चर...
रणबीर आणि आलियाचं कुटुंब त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो सतत शेअर करत आहेत. दरम्यान, नीतू कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांचं कुटुंब अतिशय शाही अंदाजात दिसत आहेत. या फोटोसोबत रणबीर-आलिया, नीतू कपूर, सोनी राजदान, महेश भट्ट, रिद्धिमा कपूर आणि तिचा पती भरत साहनी दिसत आहेत. फोटो शेअर करत नीतूने कॅप्शनमध्ये 'माय फॅमिली'  लिहिलं आहे.



ऋषी कपूर यांची आठवण...
नीतूने तिच्या इंस्टाग्रामवर रणबीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मुलाच्या खांद्यावर हात ठेवून रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. मुलाच्या लग्नाचा आनंद नीतूच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. फोटो शेअर करत नीतू कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ये आपको समर्पित है कपूर साहब, तुमची इच्छा पूर्ण झाली'.