कपूर कुटूंबाकडून शिक्कामोर्तब; याच दिवशी घेणार आलिया-रणबीर सप्तपदी
रणबीर-आलियाच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत
मुंबई : रणबीर आलियाच्या लग्नाचं स्वप्न नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांनी सजवले होतं. आता या दोघांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. तिथे लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आलिया-रणबीरला मेहंदी लावण्याचा कार्यक्रम सुरु आहे. त्याचबरोबर मेहंदी समारंभानंतर नीतू कपूर बाहेर स्पॉट होताच. पापाराझी त्यांना प्रश्न विचारले. तर दुसरीकडे, नीतू कपूरने तिच्या या उत्तराने तुमचंही मन प्रसन्न होईल. नीतूसोबत तिची मुलगी रिद्धिमा कपूरही दिसत आहे.
नीतू मोकळेपणाने बोलली
नीतू कपूर फंक्शनमधून बाहेर पडताच पापाराझींनी तिला आलियाबद्दल विचारलं, ती म्हणाली की मी काय बोलू याबद्दल आलिया बेस्ट आहे. त्याचवेळी जवळ उभी असलेली आलियाची वहिनी म्हणजेच रिद्धिमा कपूर ती डॉल असल्याचं सांगते. ती खप क्यूट असल्याचं ही रिद्धीमा म्हणते. तसंच पापाराझी या दोघींना लग्न कधी आहे असा प्रश्नही विचारला यावर रिद्धीमा म्हणते की, लग्न उद्या आहे म्हणजेच 14 एप्रिलला हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे.
मुलाच्या मेहंदी कार्यक्रमात अशी नटली रितू
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नीतू कपूर हलक्या पिस्ता रंगाचा लेहेंगा घालून हातावर मेहंदी घालून उभी असल्याचं दिसून येतं. मुलाच्या लग्नामुळे ती खूप खूश आहे, याचा अंदाज तिच्या स्टाइलवरून लावता येतो. त्याचबरोबर, रिद्धिमा कपूर देखील तिच्या भावाच्या लग्नासाठी खूप उत्सुक दिसत आहे.