सख्या बहिणी दिसणार पडद्यावर `या` शोच्या माध्यमातून; पोस्ट शेअर करत माहिती
दोन्ही बहीण जोडी त्यांच्या नवीन प्रोजेक्ट घेवून येत आहेत.
मुंबई : अनेक स्टार बहिणींच्या जोडीने बॉलीवूडमध्ये धुमाकूळ घातला असून आता या यादीत नेहा शर्मा आणि आयेशा शर्मा या नव्या नावाचा समावेश होणार आहे. दोन्ही बहीण जोडी त्यांच्या नवीन प्रोजेक्ट घेवून येत आहेत. या दोन्ही बहिणी सोशल स्वॅग नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शॉर्ट व्हिडिओद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची काही झलक दाखवतील. त्यांच्या या व्हिडिओची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
नेहा आणि आयशा शर्मा या दोघी बहिणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. कीपिंग अप विथ द कार्दशियन्स या प्रसिद्ध सिरीजवर आधारित कोणत्याही फिल्टर आणि स्क्रिप्टशिवाय, मूळ सामग्रीसह, त्याच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या टीमसह "शायनिंग विथ द शर्मा" हा शो तयार केला आहे.
रिपोर्ट्सनुसार, तिचं घर, जिम, फोटोशूट, कामाचं ठिकाण, अगदी किचनमध्येही ती जेवण बनवत असताना, सगळं काही दाखवण्यात येणार आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की, मे महिन्याच्या अखेरीस हा शो ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल. तसंच दर आठवड्याला ती चाहत्यांसाठी काहीतरी नवीन सादर करणार आहे.
नेहा शर्मा भागलपूर, बिहारची आहे आणि तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली येथून फॅशन डिझाईनचा कोर्स केला आहे. नेहा शर्माने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर तिची बहीण आयशा शर्मा सत्यमेव जयते या चित्रपटासाठी ओळखली जाते.