मुंबई : रशियाने आक्रमकपणा घेत युक्रेनवर जोरदार हल्ले चढविले... त्यामुळे अनेक युक्रेनच्या नागरिकांनी भारतात स्थलांतर केलं. युक्रेन युद्धादरम्यान भारतात आलेल्या एका तरुणीचं नशीब बदललं आहे. प्रसिद्ध गायिका नेहा भसीन (Neha Bhasin) चा भाऊ अनुभव भसीन (Anubhav Bhasin)ने नुकताचं लग्न केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे  अनुभवने युक्रेनमधून पळून आलेल्या तरूणीसोबत लग्न केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


युक्रेनमधील युद्धादरम्यान तरुणी एना होरोडेट्स्का (Anna Horodetska) भारतात आली होती. भारतात आल्यानंतर तिची भेट अनुभवसोबत झाली... त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला... सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 



युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर एना 17 मार्च रोजी स्वतःचा देश सोडून भारतात आली.  या युद्धादरम्यान ती कीव परिसरात होती. एना आणि अनुभव 2017 पासून एकमेकांना डेट करत होते.



आता दोघांनी त्यांच्या नात्याला नवं नाव दिलं आहे. दोघांचं लग्न दिल्लीत पार पडलं. खुद्द अनुभवने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 



लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'जेव्हा आम्ही भेटलो तेव्हापासून आमचा अनोखा प्रवास सुरू झाला. पण आम्ही एकत्र अनेक संकट आणि अडचणींचा सामना केला. आता घरात तुझं स्वागत...' असं म्हणत त्याने पत्नीबद्दल प्रेम व्यक्त केलं.