मुंबई : अभिनेत्री नेहा धूपिया (Neha Dhupia) सध्या चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील तसचं आहे. सोमवारी नेहा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नेहा आणि पती अंगद बेदीच्या घरी लवकरचं नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नेहा दुसऱ्यांदा आई होणार आहे. सध्या नेहाने पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर फोटो शेअर करत नेहाने कॅप्शनमध्ये, 'आम्हाला कॅप्शन ठरविण्यासाठी 2 दिवस लागले... सर्वात जास्त चांगला विचार करू शकलो, तो म्हणजे देवा तुझे आभार...' असं लिहिलं आहे. नेहाच्या या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नेहाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पूर्ण बेदी कुटुंब दिसत आहे. 


नेहाने तिन वर्षांपूर्वी  अभिनेता अंगद बेदीसोबत लग्न केलं. 10 मे 2018 साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर नेहाने 18 नोव्हेंबर 2018 साली एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मेहर असं आहे.