Neha Dhupia on Pregnancy Before Marriage: अभिनेत्री नेहा धुपिया ही कायमच आपल्या बोल्ड आणि डॅशिंग अंदाजासाठी ओळखली जाते. नेहाचं खूप मोठं फॅन (Neha Dhupia Recent News) फॉलोईंग आहे. इन्टाग्रामवरही ती आपल्या चाहत्यांना तिच्या पोस्टनं कायमच अपडेट करत असते. नेहा धुपियानं अंगद बेदीशी लग्न (Neha Dhupia Angad Bedi) केले होते. त्यांना आता दोन गोंडस मुलं आहेत. परंतु हा प्रवास नेहासाठी सोप्पा नव्हता. प्रेमात पडल्यानंतर ती लग्नाआधी गरोदर होती आणि जेव्हा ही बातमी तिच्या आईवडिलांना सांगायची वेळ आली तेव्हा मात्र नेहानं काय केलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून तिनं यावर खुलासा केला आहे. सध्या तिचे हे वक्तव्य पुष्कळ चर्चेत आहे. या संवेदनशील विषयावर बोलताना नेहा खूप हळवी झाली होती. अभिनेत्री नेहा धूपिया आणि अभिनेता अंगद बेदी यांनी 2018 साली लग्न केले. यावरून संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चेला वेग (Neha Dhupia Pregnant Before Marriage) आला होता. त्यांनी अचानक लग्न केल्यामुळे सगळेच नाना तऱ्हेचे प्रश्न विचारूही लागले. त्यातून लग्न झाल्यानंतर नेहानं लगेचच आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. त्यावेळी नेहाला अनेकांनी ट्रोल केले होते. (neha dhupia opens up about her parents reaction on her pregnancy before marriage)


तर अनेकांनी तिच्या या गोड बातमीसाठी आणि तिच्या लग्नासाठी तिला गोड शुभेच्छाही दिल्या होत्या. गरोदर असताना ती सार्वजनिक ठिकाणीही वावरू लागली होती. तिनं प्रेग्नंट असताना लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकही केला होता. 


काय म्हणाली नेहा? 


नुकत्याच टाईम्स नाऊ डिजिटलला दिलेल्या एका मुलाखतीत नेहानं लग्नापुर्वी गरोदर असण्यावर भाष्य केले आहे. त्यावर ती म्हणाली, ''मी आणि अंगदनं लग्नाआधी कुठलीही तयार केली नव्हती. लग्नाआधी मी गरोदर होते. ही बातमी मी माझ्या आईवडिलांना सांगितली तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया अशी होती की, 'हे फार छान झालं आहे परंतु तुमच्याकडे लग्नासाठी फक्त 72 तास आहेत.' तेव्हा मी गरोदर होते आणि मला अडीच दिवस गेलेले होते. मी ठरवलं मी मुंबईत परत येईन आणि मग आम्ही लग्न करू पण तेव्हा आम्ही दोघं म्हणालो चला आताच लग्न करूया.'' असा खुलासा तिनं केला आहे. अंगद आणि तिची भेट एका जीममध्ये झाली होती. 


हेही वाचा - ''...नकारात्मकता पसरवू नका'' दत्तक घेतलेल्या मुलीची गुड न्यूज देत अभिनेत्रीनं नेटकऱ्यांना सुनावलं


नेहा धुपिया आणि ट्रोलिंग


नेहा धुपिया हिनं 'रोडिज'चे जजिंग केले होते. मध्यंतरी 'रोडिज'च्या एका कन्टेस्टंटच्या ऑडिशनवेळी त्या स्पर्धकानं सांगितले होते की त्याची गर्लफ्रेंड ही त्याला डीच करून इतर पाच जणांना डेट करत होती तेव्हा त्यानं तिच्या कानशिलात लागावली होती. तेव्हा नेहानं त्याची चांगलीच शाळा घेतली होती. तेव्हा ती म्हणाली होती की, ''बॉयफ्रेंड ठेवणं, बदलणं ही तिची चॉईंस आहे. ती निवड आहे.'' तेव्हा नेहाच्या या वक्तव्यावरून नेहाला बऱ्याच प्रमाण ट्रोल केले होते. त्यानंतर काही मुलाखतीतून तिनं स्पष्टीकरणही दिले होते.