मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी हे १० मे ला गुपचून विवाहबद्ध झाले. त्यानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करुन त्यांनी ही आनंदवार्ता आपल्या चाहत्यांना दिली. नेहा-अंगदच्या या सिक्रेट वेडींगने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर मात्र नेहा प्रेग्नेंट असल्याने हे लग्न घाईत उरकले, असा कयास लावला गेला. त्यानंतर अनेक महिने नेहाच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा या न त्या तऱ्हेने रंगल्या. मात्र सुरुवातीला दोघांनीही यावर बोलणे टाळले. त्यानंतर मात्र नेहा प्रेग्नेंट नसून या सगळ्या अफवा आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मात्र या अफवा खऱ्या असल्याचे समोर आले आहे. कारण अंगदने नेहाचा बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, अफवा खऱ्या ठरल्या. 



हे फोटोज नेहाने शेअर करत लिहिले की, एक नवी सुरुवात.



अलिकडेच अंगदचा सूरमा सिनेमा प्रदर्शित झाला. यात संदीप सिंग (दिलजीत दोसांझ) च्या भावाच्या भूमिकेत अंगद दिसला. हा सिनेमा हॉकी दिग्गज संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारीत आहे. 
माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांचा अंगद बेदी मुलगा असून तो रणजीही खेळला आहे. त्यानंतर अंगदने मॉडलिंग आणि अभिनयात आपले नशिब आजमावले.