`फॅट शेमिंग`वरून नेहा धुपियाचे खडेबोल
`फॅट शेमिंग`वरून नेहाच्या रागाचा पारा सातवे आसमानवर
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नुकतीच आई बनली आहे. आई बनल्यानंतर काही महिन्यांतच नेहाने पुन्हा एकदा आपल्या कामाची सुरूवात केली आहे. परंतु एका न्यूज पोर्टलने गरोदरपणानंतर नेहाच्या वाढलेल्या वजनावर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे नेहाच्या रागाचा पारा सातवे आसमानवर पोहचला आहे. सोशल मीडिवरून एक पोस्ट शेअर करत नेहाने तिचा राग व्यक्त केला आहे.
न्यूज पोर्टने केलेल्या जाडेपणावर उत्तर देत नेहाने 'मी कोणालाही उत्तर देण्यास बांधिल नाही. अशाप्रकारे केल्या जाणाऱ्या फॅट शेमिंगने माझ्यात कोणताच फरक पडत नाही. पण फॅट शेमिंगला मी एक मोठी समस्या म्हणून मांडू इच्छिते. कारण फॅट शेमिंग हे केवळ सेलिब्रिटीजमध्येच नाही तर समाजात सामान्यांमध्येही बंद केलं गेलं पाहिजे' असं तिनं म्हटलंय.
'मी एक आई म्हणून माझ्या मुलीसाठी स्वस्थ, निरोगी आणि उत्साही राहू इच्छिते. मी रोज व्यायाम करते. कधी दिवसांतून दोन वेळाही मी वर्कआउट करते. केवळ समाजासाठी सुंदर दिसणं महत्त्वाचं नसून, सर्वात आधी आपलं आरोग्य निरोगी, सुदृढ राहणं अधिक महत्त्वाचं असल्याचं' नेहाने म्हटलं आहे.
नेहा धूपिया आणि अंगद बेदी हे दोघं गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर १८ नोव्हेंबरला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांतच नेहा पुन्हा आपल्या कामाकडे वळली आहे. टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमातून नेहा होस्ट आणि जज म्हणून काम पाहणार आहे.