मुंबई : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती दररोज सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते. तिच्या पोस्ट्स सोशल मीडियावर येताच व्हायरल होतात. आता तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती चाहत्यांची मनं जिंकत आहे. हे फोटो पाहून चाहते आणि तिचा नवरा रोहनप्रीत सिंगही तिच्यावर पुन्हा एकदा फिदा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाथरूममधले समोर आले नेहाचे फोटो
नेहा कक्करने तिचे तीन फोटो पोस्ट केले आहेत, त्यामध्ये ती बाथरूममध्ये बसलेली दिसत आहे. नेहा बाथटबच्या काठावर बसून स्माईल करत आहे. नेहाने पांढरा बाथरोब आणि बाथरूम फ्लॅट घातला आहे. या फोटोंमध्ये नेहा खूपच क्यूट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


सकाळी सकाळी शेअर केले फोटो 
हे फोटो शेअर करताना नेहा कक्करने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'गुड मॉर्निंग... मी आंघोळ केली आहे, दिवसाची सुरुवात सकारात्मक चहाने करा.' तिचे हे फोटो पाहून नवरा रोहनप्रीत सिंग स्वत:ला रोखू शकला नाही. नेहाचे फोटो इन्स्टाग्रामवर येताच त्याने त्यावर कमेंन्ट केली आहे. रोहनप्रीत सिंहने कमेन्टमध्ये लिहिलं आहे की, 'अहं अहं !! वाव हाय !! अरे मी म्हणालो आपण किती सुंदर आहात!!!! '



चाहत्यांना आवडला फोटो
बंधू टोनी कक्कड यानेही नेहा कक्करच्या या फोटोवर कमेंन्ट केली आहे. टोनीने लिहिलं की, 'किती सुंदर.'  नेहाचे चाहतेदेखील तिच्या फोटोवर कमेंन्ट करून नेहाचं सतत कौतुक करत आहेत.तर दुसरीकडे नेहाने शेअर केलेल्या या फोटोमुळे तिला ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागत आहे. तीन तासांपूर्वी समोर आलेल्या या फोटोवर लाईक आणि कमेंन्टचा पाऊस पडतोय.