मुंबई : बॉलिवूड गायिका नेहा कक्कर नुकतीच पती रोहनप्रीत सिंगसोबत मुंबईच्या वांद्रे येथे स्पॉट झाली. नेहा रोहनबरोबर शॉपिंगसाठी गेली होती, त्यावेळी तिचे फोटो कॅमेऱ्यात कैद करण्यात आले होते. नेहा यावेळी पतीचा हात धरुन चालत असताना दिसली, नेहाने काळ्या रंगाचं लूज टी-शर्ट आणि ट्राऊजर परिधान करीत होती, असं दिसतं आहे की, नेहा कदाचित लवकरच गूडन्यूज देवू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा मुंबईच्या वांद्रे येथे एका दुकानासमोर दिसली. यादरम्यान ती खूप आनंदी दिसत होती. ही जोडी एकमेकांचा हात धरून खूपच गोंडस दिसत होती. सोशल मीडियावरही तिच्या या फोटोंना बरीच पसंती मिळत आहे, नेहा प्रेगनंन्ट आहे का, असा सवाल तिचे चाहते तिला विचारत आहेत.


https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/neh.png


काही दिवसांपूर्वी सुट्टीनंतर नेहा मुंबईत परतली आहे. यादरम्यान ती रोहनप्रीतसोबत मुंबई विमानतळावर दिसली होती. नेहाने त्यावेळीही ढगळा टी-शर्ट घातला होता. त्यानंतर नेहाच्या गरोदरपणाविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. नेहा काही दिवसांपासून इंडियन आयडल शोमध्ये देखील दिसली नाही. नेहा या शोमध्ये जज म्हणून कामगिरी करताना याआधी दिसली आहे. मात्र तिने सध्या कामावर सुट्टी घेतली आहे. पापराझीचा आवाजवर नेहानेही त्यांना प्रतिसाद दिला.