Neha Kakkar अडचणीत, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
गाण्यामुळे नेहा - टोनी कक्कर आले अडचणीत
मुंबई : शेहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचं 'शोना शोना' हे गाणं नेहा कक्कर आणि टोनी टक्कर यांनी गायलं आहे. हे गाणं सध्या सगळ्यांच्याच प्लेलिस्टमध्ये आहे. या गाण्याच्या शब्दांनी सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पण या गाण्याने सध्या कक्कर भावडांना अडचणीत टाकलं आहे. या गाण्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
या गाण्यात अतिशय अश्लील कंटेट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गाण्यावर काही प्रमाणात निर्बंध लादणे गरजेचे आहे, असं यामध्ये म्हटलं आहे. महत्वाचं या याचिकेत नमूद केलं आहे की, हे अश्लिल गाणं कोणत्याही नियमांशिवाय उपलब्ध आहे.
नेहा कपूर आणि मोहित भाडू यांनी ही याचिका दाखल केली असून त्यांनी हे गाणं यूट्यूब, गंगा डॉट कॉम, इंस्टाग्राम, टीव्ही आणि रेडिओ या सगळ्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या गाण्यावर त्यांनी असा आरोप केला आहे की,'हे गाणं ऐकणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर नकारात्मक प्रभाव पाडतं. तसेच या गाण्यातून मद्य, महिला यांना टार्गेट करून प्रमोट केलं आहे.'
तसेच बार आणि बेंच असोसिएशनमध्ये फक्त शोना शोनाचं नाही तर हनी सिंहच्या सैय्या जी आणि मखना ही दोन्ही गाणी अश्लिल असल्याचं म्हटलं आहे. शोना शोना या गाण्यात सिद्धार्थ सेहनाजला सांगतो, तेरा बदन, तेरा इलाका, मैने ना झाका... झुपा ना, झुपा ना, दिखा तेरा बदन का कोना कोना...