मुंबई : 'भाभी जी घर पर है...' (Bhabi Ji Ghar Par Hai) मालिका प्रेक्षकाचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. मालिकेतील  अभिनेत्री नेहा पेंडसेच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. नेहा मालिकेत अनीता भाभीच्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनीता भाभीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी नेहा सध्या पती शार्दुल सिंह ब्यास (Shardul Singh Bayas) सोबत रोमान्स करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा पेंडसेचा पतीसोबत खुल्लम खुल्ला Romance सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ती पतीला किस करताना दिसत आहे.  व्हिडिओमध्ये दोघेही फार आनंदी दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करत नेहाने पोस्टला कॅप्शन देखील दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर लाईक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कमेन्ट सेक्शनमध्ये काही नेटकऱ्यांनी नेहाला तुझ लग्न कधी झालं? असा प्रश्न विचारला आहे. तर काहींनी तर विभूती भैय्याकडे तक्रार करेल अशी कमेन्ट केली आहे. नेहा सध्या तिच्या या व्हिडिओमुळे प्रचंड चर्चेत आली आहे.