आई नाही व्हायचंय...; Eggs Freeze करणारी 38 वर्षांची मराठमोळी अभिनेत्री असं का म्हणाली?
Marathi Actress On Eggs Freeze : मराठमोळी अभिनेत्रीनं वयाच्या 38 व्या वर्षी Eggs Freeze केले असून आई व्हायचं नाही यावर वक्तव्य केलं आहे.
Neha Pendse : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेनं अभिनय क्षेत्रात स्वत: चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसोबत हिंदी मालिका आणि चित्रपटसृष्टीत काम केलं आहे. आता नेहा अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी देखील ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या तिचं चर्चेत असण्याचं कारण तिचं वैवाहिक जीवन आहे. नेहानं 2020 मध्ये शार्दुल सिंग बायससोबत सप्तपदी घेतल्या. त्यात तिनं आता तिचे एग्ज्स फ्रीज करण्याविषयी सांगितलं आहे.
नेहानं स्त्रीबीज गोठवले
नेहानं नुकतीच 'टाईम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत नेहानं तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यात तिचं वैवाहिक आयुष्य आणि लग्नानंतरचं तिचं आयुष्य कसं आहे हे सांगितलं आहे. याविषयी बोलताना नेहा म्हणाली की तिनं स्त्रीबीज गोठवले आहेत. लग्नाच्या एक-दोन वर्षात मला आई होण्याची इच्छा झाली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कधीच आई व्हायचे नव्हते. त्यानंतर मी यावर गांभीर्याने विचार केला. मला वाटलं काही काळानंतर हा विचार माझ्या मनातून जाईल कारण एक मूल सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी आहे.'
नेहानं आई होण्याच्या विचारावर घेतला मोठा निर्णय
पुढे नेहा म्हणाली, '8 महिने खूप विचार केल्यानंतर मी एक मोठा निर्णय घेतला. मी ठरवलं की मी स्त्रीबीज गोठवणार. मी ते केलं देखील, मला आई व्हायचं तर आहे पण आता नाही. काही तरी आहे जे मला आई होण्यापासून थांबवते. माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं की तू तुझे स्त्रीबीज गोठव, त्यानंतर जेव्हा पाहिजे तेव्हा यावर विचार कर. मी आई होईन किंवा नाही. माझ्या मनात यावर गोंधळ सुरु आहे. मला कोणावरही माझ्या कामासाठी अवलंबून रहायचं नाही आहे. पण जेव्हा मुल होईल तेव्हा मला कोणावर तरी अवलंबून रहावं लागेल. पैशासाठी देखील कोणावर अवलंबून रहावं लागू शकतं.'
हेही वाचा : नसीरुद्दीन शाह यांच्यावर मित्रानेच केला होता चाकू हल्ला, पहिल्यांदाच सांगितला 'तो' प्रसंग
आई होण्याचा विचार योग्य नाही...
पुढे काम करण्यावर नेहा म्हणाली की 'मी स्वत: ला सुपरवूमन देखील समजत नाही. मी आयुष्यभर काम करेन, पैसे कमावेन, घरावर लक्ष देईल इतकं सगळं करण्याची माझ्यात ताकद नाही. पण आता बाळा होण्याचा विचार हा माझ्यासाठी योग्य पर्याय नाही आणि त्यासोबत माझ्या मानसिक स्वास्थसाठी देखील ते योग्य नाही.'