मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटीज असो किंवा छोट्या पडद्यावरील सेलिब्रिटीज, प्रत्येकाला स्टाईलमध्ये राहायला आवडते. हे कलाकार नेहमीच मुलाखत, चित्रपट प्रमोशन किंवा इतर कोणत्याही खास कार्यक्रमात इतरांपेक्षा हटके दिसण्यासाठी सर्वांपेक्षा वेगळी फॅशन करण्यावर भर देतात. पण याच स्टाइल, फॅशन किंवा हटके ड्रेसच्या नादात अनेकदा त्यांना लाजिरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता असेच काहीसे गायिका नेहा भसीनसोबत (Neha Bhasin) घडले आहे. शनिवारी नेहा मुंबईत रश्मी देसाईसोबत (Rashami Desai)  दिसली होती. त्यावेळी फॅशनच्या नादात असे काही घडले की ड्रेसमुळे नेहा भसीनला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गायिका नेहा भसीन तिच्या स्टाईल आणि बोल्डनेससाठी प्रसिद्ध आहे. तिचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नेहाला तिचे आयुष्य हे मोकळेपणाने जगायला आवडते. तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहा नेहमीच चर्चेत असायची. पण आता नेहा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. शनिवारी नेहा रश्मीसोबत दिसली. या दरम्यान, तिच्या नजरा या तिच्या ड्रेसवर खिळल्या. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये नेहा खूप सुंदर दिसत असली तरी तिच्याकडून एक चूक झाली. नेहा या ड्रेसमधून प्राईज टॅग काढायला विसरली. नेहाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


नेहा तिच्या ड्रेसवरील टॅग न काढल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. एक नेटकरी म्हणाला, नेहा तिच्या कपड्यांचा टॅग काढायला विसरली. दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली की, नेहा तिच्या ड्रेसचा टॅग काढायला विसरली आणि तो धाग्यासोबत बाहेर लटकताना दिसत आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, तिने उलटा ड्रेस का परिधान केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी रश्मीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी ती सुंदर दिसत आहे असं म्हटलं. सोशल मीडियावर रश्मी देसाईच्या स्टाइलची खूप चर्चा होत आहे. रश्मी देसाई तिच्या लूक, स्टाईल आणि ट्रान्सफॉर्मेशनमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती.