नेहा शर्मा बोल्ड जिम लूकमुळे ट्रोल...डंबेल्स उचलण्यासाठी झुकली आणि...
अभिनेत्री नेहा शर्मा वीकेंडला वर्कआउट करताना दिसली. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. आज ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आहे
नेहा शर्मा वीकेंडला वर्कआउट करताना दिसली. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. नेहा जिममध्ये स्पोर्ट्स ब्रा आणि ब्लॅक पँटमध्ये दिसली. तिचा लूक खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होता. मात्र या जिममधील बोल्ड लूकमध्ये नेहा शर्माला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय.
जिममध्ये वर्कआऊट करताना फिगर फ्लॉन्ट करताना तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. नेहा शर्मा नेहमीच तिचे वर्कआऊटचे व्हिडीओ शेअर करत असते, मात्र हा बोल्ड लूक पाहून चाहत्यांकडून कमेट्सचा पाऊस पडत आहे.
छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याची जादू पसरवणारी सुंदर अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. तिने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत स्वतःची एक खास आणि वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहाची एक झलक तिच्या चाहत्यांना मोहून टाकते. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. शनिवारी नेहा जिममध्ये वर्कआऊट करताना दिसली. यावेळी ती खूपच हॉट दिसत होती.