ना नेटफ्लिक्स ना प्राईम, `या` ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा विकी कौशलचा Sam Bahadur सिनेमा
Sam Bahadur On OTT Platform : सॅम बहादुर हा सिनेमा नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमवर नाही तर `झी 5` वर पाहता येणार आहे. यावर अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही.
Sam Bahadur OTT Release : अभिनेता रणबीर कपूरचा 'ॲनिमल' आणि विक्की कौशलचा 'सॅम बहादूर' सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'सॅम बहादूर' सिनेमाला (Sam Bahadur) प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण रणबीरच्या ॲनिमलपुढे विक्कीचा सॅम बहादूर फिका पडला आहे. अशातच आता सिनेमा ओटीटीवर (OTT Release) कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशातच आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
सॅम बहादूर चित्रपट सॅम माणेकशॉचा (Sam Manekshaw) बायोपिक ड्रामा आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा विकी कौशलचा दमदार अभिनय पाहायला मिळतोय. याशिवाय सॅमच्या पत्नी सिलीची भूमिका साकारणारी सान्या मल्होत्राआणि भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणारी फातिमा सना शेख या चित्रपटात दिसत आहेत. त्यामुळे ज्यांना थेटरमध्ये जाता आलं नाही, त्यांना हा सिनेमा ओटीटीवर पाहता येणार आहे.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सॅम बहादुर हा सिनेमा नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राईमवर नाही तर 'झी 5' वर पाहता येणार आहे. यावर अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. विकी कौशलचा चित्रपट वॉल्ट डिस्ने स्टुडिओ मोशन पिक्चर्सद्वारे वितरित केला जातो, त्यामुळे डिस्ने हॉटस्टारवर देखील हा सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकतो. हा चित्रपट एका महिन्यानंतर म्हणजेच 2024 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. वास्तविक, सॅम बहादूरची निर्मिती झी स्टुडिओने केलीये.
दरम्यान, रणबीरच्या अॅनिमलनं पहिल्याच दिवशी 68 कोटींची जोरदार कमाई केली होती. तर विकी कौशलचा सिनेमा सॅम बहादूरनं पहिल्या दिवशी 6 कोटींचा गल्ला जमवला होता. तर तीन दिवसात सिनेमानं 25 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. रिलिज झाल्यानंतर या चित्रपटाला समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी चाहत्यांनी सुरुवातीला चित्रपटाला काही खास प्रतिसाद दिला नाही.