मुंबई : 1994 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास होतं. कारण या वर्षी 'हम आपके है कौन' प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहण्यासाठी एवढी गर्दी जमली की कोणी कल्पनाही केली नसेल.  माधुरी दीक्षित, सलमान खान, अनुपम खेर, रीम लागू आणि बिंदू यांसारख्या अनेक स्टार्स या सिनेमात होते.   संपूर्णपणे कौटुंबिक आणि अतिशय भावनिक विषयावर बनवलेल्या या चित्रपटाने लोकांच्या ओठांवर हसू आणले आणि त्यांच्या डोळ्यात पाणीही आणलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा मनापासून लिहिण्यात आली होती आणि ती साकारणारे कलाकारही अतिशय विचारपूर्वक निवडले गेले होते. प्रेमच्या भूमिकेला सलमान अगदी योग्य न्याय दिला, तर माधुरीने बबली निशाची भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच चित्रपटात दिसलेल्या टफीबद्दल आपण काय म्हणू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का की, कोणत्या पात्राची कास्टिंग निर्मात्यांसाठी सर्वात कठीण होती? नाही...ना सलमान, ना माधुरी ना टफी. मग या सिनेमात दुसरं कोणीतरी होतं ज्याला निवडण्यासाठी निर्मात्यांना खूप प्रयत्न करावे लागले.


पूजा भाभीच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली
या चित्रपटातील हे एक महत्त्वाचं पात्र होतं. प्रेम आणि निशा यांच्या प्रमुख भूमिका असल्या तरी चित्रपटाचा पाया पूजा नावाच्या व्यक्तिरेखेवरच उभा राहिला. पूजाचं नातं, लग्न, दोन्ही कुटुंबांची भेट, मुलाचा जन्म आणि त्यानंतर पूजाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली परिस्थिती या सर्व गोष्टींवर अवलंबून होते. ही व्यक्तिरेखा जितकी महत्त्वाची होती तितकीच तिची कास्टिंगही तितकीच अवघड होती. कारण निर्मात्यांना या भूमिकेसाठी परफेक्ट अशी व्यक्ती हवी होती.   


नव्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. पण सुदैवाने एकाच दिवसात तीन जणांनी रेणुका शहाणे यांचं नाव सूरज बडजात्या यांना सुचवलं. हे पाहून दिग्दर्शकालाही आश्चर्य वाटलं, म्हणून त्यांनी रेणुकाचं रंगमंच नाटक पाहिलं आणि ऑडिशननंतर तिला फायनल केलं. रेणुकाला ही भूमिका आणखी एका कारणासाठी मिळाली आणि ती म्हणजे तिची स्माईल जी इतकी निरागस आणि सुंदर होती की त्यामुळे तिला ही भूमिका मिळाली.


हे कोणाला क्वचितच  माहित असेल की, चित्रपटात दोन वेग-वेगळे कुत्रे टफीच्या पात्रात दिसत आहेत. एक ज्यामध्ये शांतपणे बसणं किंवा पडून राहण्याची सीन एका कुत्र्याने केले आहेत.  आणि चालणे, धावणं हे सीन दुसऱ्या कुत्र्याने केले होते