सलमानला स्टार करणारा हिमेश रेशमिया आज कोट्यवधींचा मालक
सलमानच्या सिनेमांमध्ये हिमेशचं मोलाचं योगदान
मुंबई : गाणी आणि जीवन यांच्यात काही वेगळ नातं आहे. काही गाण्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, तर काही गाण्यांमुळे काहींना भूतकाळ आठवतो. गायक हिमेश रेशमियाच्या (Himesh Reshammiya)ने देखील त्याच्या गाण्याने अनेकांना मंत्रमुग्ध केलं. हिमेशने बॉलिवूडला अनेक प्रसिद्ध गाणी दिली. ज्यामुळे त्याच्या करियरला एक वेगळा मार्ग मिळाला. हिमेशच्या वडिलांचं स्वप्न होतं ही त्याने एक प्रसिद्ध गायक व्हाव आणि हिमेशने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं.
हिमेशने सलमान खानच्या 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमातून आपल्या गाण्याच्या करिअरची सुरुवात केली. आज ज्याठिकाणी हिमेश आहे, त्याचे श्रेय अभिनेता सलमान खान देखील जातं. एवढंच नाही तर खुद्द हिमेशने ही गोष्ट अनेकदा सांगितली आहे.
सलमानने हिमेशला संधी दिली, पण हिमेशच्या गाण्यांमुळे सलमानच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कोटी रूपयांचा गल्ला जमवला. 'तेरे नाव', 'ये है जलवा', 'हॉलो ब्रदर' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सलमान आणि हिमेशनने एकत्र काम केलं आहे. त्यामुळे सलमानला स्टार करणारा हिमेश रशमिया आज कोट्यवधींचा मालक आहे... आसं म्हणायला हरकत नाही.
हिमेशने आतापर्यंत 800 हून अधिक गाणी गायली आहेत. तसेच 120 गाणी कंपोज केले आहेत. हिमेशचा पहिला अल्बम 'आप का सुरुर' चाहत्यांच्या पसंतीस पडला. या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं.
रिपोर्टनुसार हिमेशचं नेट वर्थ 10 मिलियन डॉलर म्हणज 72 कोटी रूपयांच्या घरात आहे. हिमेश एका गाण्यासाठी 15 ते 20 लाख रूपये मानधन घेतो. एवढंच नाही तर हिमेश स्टेज शोच्या माध्यमातून देखील प्रचंड कमाई करतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो एका स्टेज शोसाठी 40 लाख रूपये घेतो.
गाण्याव्यतिरिक्त हिमेश त्याच्या लग्झरी लाइफस्टाइलसाठीही खूप प्रसिद्ध आहे, त्याला कार कलेक्शनची खूप आवड आहे. हिमेशकडे BMW 6 सीरीज आहे ज्याची किंमत 1.2 कोटी रुपये आहे, यासोबतच त्याच्याकडे आणखी अनेक लक्झरी कार आहेत.