मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची धूम प्रेक्षकांनी लगेचच टेलिव्हिजनवर अनुभवली. पण, यंदाच्या वर्षी फिल्मफेअर पुरस्काराचांची चर्चा झाली ती म्हणजे एका नकारात्मक गोष्टीमुळे. फिल्मफेअर २०२० या पुरस्कार सोहळ्यात यंदा तब्बल १३ पुरस्कार मिळवत बाजी मारली ती म्हणजे झोया अख्तर दिग्दर्शित 'गली बॉय' या चित्रपटाने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटाच्या वाट्याला पुरस्कारांच्या रुपात घवघवीत यश आलं. पण, दुसरीकडे मात्र या चित्रपटाच्या स्पर्धेत असणाऱ्या इतरही काही चित्रपटांना आणि कलाकारांना डावललं गेल्याचा सूरही नेटकऱ्यांनी आळवला. परिणामी #BoycottFilmfare हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला. 


चित्रपटात अर्ध्याहून अधिक वेळासाठीसुद्धा आलियाचा वावर नव्हता. पण, तरीही तिला पुरस्कृत करण्यात आलं. त्यामुळे फिल्फफेअर पुरस्कारांसाठीच्या परिक्षक मंडळींना 'गली बॉय' हा चित्रपट नेमका आम्हाला कसा वाटतो हे नेटकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. त्याशिवाय 'अपना टाईम आएगा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गीतरचनेचा पुरस्कार मिळण्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला.


फक्त असंतुष्ट चाहतेच नव्हे, तर गीतकार मनोज मुंतशीरनेही ट्विट करत थेट यापुढे आपण पुरस्कार सोहळ्यांनाच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. सर्वोत्कृष्ट गीतरचना या विभागात मनोज मुंतशीर लिखित 'तेरी मिट्टी' या गाण्याचासुद्धा समावेश होता. पण, आपण लिहिलेल्य या गीताला योग्य न्याय न मिळाल्यामुळे त्याने थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ''मी संपूर्ण आयुष्यभर प्रयत्न केला तरीही 'तू कहती है तेरा चाँद हूँ मै और चाँद हमेशा रहता है....' याहून चांगल्या ओळी लिहू शकत नाही. तुम्ही हजारोंना भावूक करणाऱ्या त्या शब्दांचा आणि मातृभूमीप्रती असणाऱ्या भावनांना सन्मान करण्यात कमी पडलात. आणि यापुढे मी तुमच्याविषयीच विचार करत राहिलो तर हा माझ्या कलेचा अनादर असेल. त्यामुळे मी अशा सोहळ्यांना अलविदा करतो'', असं ट्विट करत आपण यापुढे अखेरच्या श्वासापर्यंत कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार नसल्याची शपथच त्याने घेतली.






फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याच अपेक्षित चित्रपट अपयशी ठरले असून, गली बॉयला मिळालेलं यश पाहता इथे पुन्हा एकदा नावाला असणाऱ्या वजनाचा आणि कलाविश्वातील स्थानाच्या मुद्द्याने डोकं वर काढलं.