Kiara Advani Pregnancy Rumours: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेता कार्तिक आर्यनसोबत (Kartik Aaryan) ती लवकरच 'सत्यप्रेम की कथा' (Satyaprem Ki Katha) या चित्रपटात झळकणार आहे. 29 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात झळकणार आहे. पण सध्या सिनेमाच्या चर्चेऐवजी कियारा एका वेगळ्याच गोष्टीमुळं चर्चेत आली आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या (Sidharth Malhotra)  घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अर्थात सिद्धार्थ कियाराने ही बातमी दिलेली नाहीये तर कियाराच्या एका फोटोमुळं नेटकऱ्यांनी असे तर्क-वितर्क लढवले आहेत. (Kiara Advani And Sidharth Malhotra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कियारा आणि सिद्धार्थ यांनी फेब्रुवारीत मोजक्याचं पाहुण्यांच्या उपस्थितीत उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही सध्या त्यांची मॅरिड लाइफ एन्जॉय करत आहेत. तर, एकीकडे कियारा तिच्या आगामी चित्रपटासाठीही उत्सुक आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जयपूर येथे आहे. त्याच दरम्यान तिथल्या एका फोटोमुळं कियारा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 


शनिवारी, 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक आणि कियारा जयपूर येथे होते. यावेळी दोघांनीही एकाच कलरचे ड्रेस परिधान करुन एक फोटो काढला आहे. हाच फोटो कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. तर, कॅप्शनमध्ये पक्का? सौ टक्का!! सत्यप्रेम की कथा येत्या पाच दिवसांत, असं लिहलं आहे. कार्तिकने टाकलेला तो फोटो काहीच वेळात इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. 


कियाराचा तो फोटो पाहून नेटकऱ्यांनी ती गरोदर असल्याची शंका उपस्थित केली आहे. तर, काहींनी फोटोत तिचे बेबी बंप दिसत असल्याचंही म्हटलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी तिला तु गरोदर आहेस का? असा प्रश्न विचारला आहे. तर, काहींनी थेट ती गरोदर असल्याचा तर्क लावला आहे. 



एकीकडे नेटकऱ्यांमध्ये कियारा-सिद्धार्थ आई-बाबा होणार असल्याची चर्चा रंगत असताना काही नेटकऱ्यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. एका युजर्सने म्हटलं आहे की ती आज सत्यप्रेम की कथा या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जयपूर येथे आले होते. तिथे तिने हिल्स घालून डान्सदेखील केला तिची ती एनर्जी पाहून ती गरोदर असेल असं वाटतं नाही. तर, एका युजर्सने एक गमतीदार कमेंट केली  आहे. मला वाटतं कियाराने दाल बाटी चुरमा खाल्ला असेल, असं म्हणत नेटकऱ्यांनाच फटकारले आहे.