मुंबई : अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षीत राधे योर मोस्ट वॉन्टेड(Radhe Your Most Wanted Bhai) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानने यंद्याच्या वर्षी देखील त्याच्या चाहत्यांसाठी राधे चित्रपटाच्या रूपात ईदी आणली आहे. सर्वच जण सलमानच्या आगामी  चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे. नुकताच चित्रपटाचं 'सीटी' मार गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाच्या पहिल्या गाण्यात सलमान अभिनेत्री दिशा पटानीसोबत थिरकताना दिसणार आहे. हे गाणं प्रदर्शित होताचं तुफान व्हायरल होत आहे. सलमान खानने हे गाणे सोशल मीडियावर शेअर केले असून आणि अल्लू अर्जुनचे आभार देखील मानले.  गाणं सोशल मीडियावर शेअर करत सलमानने कॅप्शन देखील लिहीलं आहे. 



'अल्लू अर्जुन सीटी मार गाण्यासाठी आभार, या गाण्यावर तू फार चांगलं परफॉर्म केलं आहे. तुझ्या डान्सचा अंदाज, स्टायल खुपचं अप्रतिम आहे.' सलमानच्या या पोस्टवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने ईदच्या दिवशी नक्की शिट्ट्या वाजतील असं कमेंट केलं आहे. 


'राधे' शिवाय सलमान खाननं 'टायगर 3' या सिनेमाच्या शूटिंगची तयारी सुरू केली आहे. या सिनेमात भाईजान पुन्हा एकदा कतरिना कैफसोबत ऑनस्क्रीनवर रोमान्स करताना दिसणार आहे. एका वृत्तानुसार, सलमान खानने शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमाचं वेळापत्रकही पूर्ण केलं आहे.