मुंबई : बॉलिवूड गायिका नेहा कक्करने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. नेहा पती रोहनप्रीत सिंग सोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा बेबी बंप दाखवत आहे. नेहाच्या प्रेग्नन्सीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. नंतर हे उघड झाले की नेहा गर्भवती नाही, तिच्या आगामी गाण्याचे ते शीर्षक होते. वास्तविक, नेहा आणि रोहनने अलीकडेच या गाण्यात 'ख्याल रख कर' नावाचे गाणे रिलीज केले आहे, नेहा गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता नेहाने तिच्या इंस्टाग्रामवर गाण्याच्या शूटिंग दरम्यान एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नेहा 'बेबी बंप' दाखवत आहे. व्हिडिओमध्ये नेहा एका पाणीपुरी खाताना दिसत आहे. यादरम्यान रोहनप्रीत सिंगही तिच्यासोबत उपस्थित आहे. 'ओह किक मार रहा है' असं ती या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. त्यानंतर ती आणि रोहन मोठ्याने हसत आहेत.



नेहाने 24 ऑक्टोबर रोजी पंजाबी सिंगर रोहनप्रीत सिंगशी लग्न केले होते. नेहानेही आपल्या लग्नाची घोषणा अशा प्रकारे केली की लोकांमध्ये ती खरोखर लग्न करीत आहेत की एखाद्या गाण्याचे प्रमोशन होते याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. वास्तविक नेहाच्या लग्नाच्या वेळी एक गाणेही रिलीज करण्यात आले होते ज्याचे नाव होते 'नेहू व्या'. हे गाणे नेहाच्या लग्नाच्या वेळी रिलीज झाले होते.