मुंबई : बॉलीवूडचा हँडसम हंक अभिनेता वरुण धवनने आपल्या दमदार अभिनयाने नेहमीच चाहत्यांना प्रभावित केले आहे.सोबतच फिट अंदाज तरुणाईला त्याच्या प्रेमात पडणारा ठरतो आहे.  वरुणची गणना बी-टाऊनमधील सर्वात फिट कलाकारांमध्ये केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरुणच्या अ‍ॅब्स आणि सेक्सी बॉडीवर चाहत्याते फिदा आहेत, मात्र आता नवविवाहित कतरिना कैफ देखील वरुणच्या फिटनेसवर फिदा झाल्याचं दिसून येतंय.


वरुणचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल


वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शर्टलेस वरुण झोपलेला दिसत आहे आणि तो अॅब्स फ्लॉन्ट करत आहे. वरुण एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे. त्याचा फोटो शेअर करत वरुणने लिहिले - मला पाणी हवे आहे.


वरुणचा शर्टलेस फोटो पाहून सेलेब्स थक्क 


वरुणच्या शर्टलेस फोटोने चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींना प्रभावित केले आहे. बॉलीवूड अभिनेता दिनो मोरियाने वरुणच्या फोटोवर कमेंट केली – शार्प लग रहो हो भाई.


कतरिना कैफने वरुणच्या पोस्टवर फायर इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. कतरिना स्वतःही फिटनेस फ्रीक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत वरुणची फिट बॉडी आणि अॅब्सने कतरिनालाही प्रभावित केले आहे. नवविवाहीत कतरिनाने केलेली कमेंट पाहून अनेकजण चकीत देखील झाले आहेत. कतरिना ही वरुणच्या फिटनेसवर फिदा झाल्याचं दिसून येत आहे. 



कॉमेडियन आणि अभिनेता झाकीर खानने वरुणच्या फोटोवर कमेंट केली - भाऊ, ही खाण्याची बिस्किटे पोटावर का ठेवतोय, मित्रा आत ठेव. या आणि अशा मजेदार कमेंट कलाकारांनी वरुणच्या या फोटोवर केल्या आहेत.



या चित्रपटांमध्ये वरुण दिसणार 


वरुणच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे अनेक चित्रपट आहेत. वरुण जुग जुग जिओमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कियारा आडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनीष पॉल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 24 जून 2022 रोजी रिलीज होणार आहे. 'भेडिया' या चित्रपटातही वरुण दिसणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत क्रिती सेनन दिसणार आहे.