मुंबई : ९०व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ऑफिशियल एंट्री मिळवलेल्या अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन या सिनेमाने पहिल्या दिवशी ९६ लाखांची कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात नक्षलवादी भागात आपलं कर्तव्य चोख पार पाडणाऱ्या एका क्लार्कची कथा मांडण्यात आलीये. राजकुमार राव याची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. त्यासोबतच अंजली पाटीलचीही या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.


न्यूटनला ऑस्करवारीसाठी एंट्री मिळाल्याने या सिनेमाच्या कमाईत वाढ होईल अशी आशा आहे. बर्लिन फिल्मफेस्टिव्हलसह अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा बोलबाला झाला आहे. समीक्षकांनीही न्यूटन सिनेमाचे तसेच राजकुमार रावचे कौतुक केले आहे.