मुंबई : हॉट आणि बोल्ड अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर कायमच अ‍ॅक्टिव्ह असते. ती तिच्या हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करते. परंतु नियाने एक असा व्हिडिओ शेअर केला आहे की, तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुमचं देखील हसणं थांबवू शकणार नाही. हा व्हिडिओ शेअर करून नियाने स्वतःचीच चेष्टा केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी नियाने अभिनेता रवी दुबेसोबत डान्स व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये दोघेही डान्स करताना खूप मजा करतायेत. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. निया आणि रविची जोडी ऑनस्क्रीनमधील सर्वोत्कृष्ट जोडी आहे. दोघेही शो जमाई राजामध्ये एकत्र दिसले आहेत. या शोपासून दोघांची जोडी लोकप्रिय झाली.यानंतर हे दोघे ओटीटीवर रिलीज झालेल्या 'जमाई राजा २'मध्ये दिसले. यात या दोघांचे बोल्ड सीन दाखविण्यात आले होते, हे सीन बरेच चर्चेत राहिले होते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)


निया टीव्हीवरील शो 'नागीन 4' मध्ये दिसली होती. या शोमध्ये नियाबरोबर जस्मीन भसीन, रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरिया हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या शोमध्ये नियाने इच्छाधारी नागिनची भूमिका साकारली होती. यानंतर ती 'डेंजर प्लेयर: मेड इन इंडिया' मध्ये सहभागी झाली आणि या सिजनमधील ट्रॉफी तिच्या नावावर झाली


नियाने आतापर्यंत तिच्या आगामी प्रोजेक्टसंबधित कोणतीही माहिती दिली नाही. पण तिच्या चाहत्यांना तिला लवकरात लवकर पुन्हा एकदा टीव्हीवर बघायचं आहे. नियाचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे.


निया शर्मा आज टीव्ही विश्वात टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच, नियाने आपले गोल्स पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. काही काळापूर्वी नियाने मुंबईत स्वत:साठी घर विकत घेतलं. नियाने आपल्या नवीन घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करण्याबरोबर नियाने लिहिले की, ''फायनली मी मुंबईत घर विकत घेतलं''.