मुंबई : सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या हटके आऊटफिटसाठी चर्चेत असतात. कधी हटके असा इंडियन तर कधी वेस्टन लूक करत ते चाहत्यांचं लक्षवेधून घेताना दिसतात. त्यात सध्या देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती पॉप स्टार निक जोनस चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच कारण म्हणजे निकनं अमेरिकतून नाही तर महाराष्ट्रातील एक भागातून खास आऊटफिट बनवून घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला सोलापूराची चादरी चांगलीच ठावूक असेल. या चादरींची वेगळी खासियत असते. त्याचं फॅबरिक आणि डिझाईन यामुळे ते लगेचच ओळखून येतात. आता तुम्ही म्हणाल सोलापूरच्या चादरी आणि निकचं काय कनेक्शन ?
तर निकच्या काही समोर आलेल्या फोटोत त्याने सोलापूरी चादरीप्रमाणे वापरलेल्या कपड्याचं चक्क शर्ट घातलेलं दिसतंय.


निकने सेंट लुईसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हा सोलापुरी जेकार्ड चादरीचा शर्ट घातला होता.  यामुळे सोलापुरी चादर पुन्हा एकदा जगात चर्चेचा विषय ठरली आहे. ही चादर सोलापुरातील चाटला टेक्‍स्टाईल इंडस्टीमध्ये तयार झाली असून, निकच्या या चादरीच्या शर्टाच्या बाहींवर "चाटला आर' हा ट्रेडमार्क लिहिलेला दिसून येतो. 



विशेष म्हणजे, चाटला टेक्‍स्टाईल इंडस्ट्रीजचे मालक गोवर्धन चाटला यांनाही त्यांच्या फॅक्‍टरीमधून तयार झालेल्या चादरपासून शर्ट तयार झाल्याचा व तोही अमेरिकन पॉप सिंगर निक जोनासने तो घातलेला पाहून आश्‍चर्य वाटले. 


त्याने या आऊटफिटमधील फोटो शेअर करत हटके कॅप्शन देखील दिलं आहे. "या कपड्यांनी ऊब दिली' असे त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.