मुंबई : बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरूख खानचा आज (2 नोव्हेंबर) 54 वा वाढदिवस. टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणार शाहरूख खान अनेक नावांनी ओळखला जातो. त्याचे चाहते त्याला 'बादशाह', 'किंग खान', 'रोमांस किंग', 'किंग ऑफ बॉलिवूड' या नावांनी हाक मारतात. किंग खानने बॉलिवूडला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सारखा रोमँटिक सिनेमा आणि 'डर' सारखा नकारात्मक भूमिकेचा हिट सिनेमा शाहरूखने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरूख खानचे चाहते जगभरात आहेत. नायजेरियन चाहत्यांकडून शाहरूखला शुभेच्छा  लोकं देखील शाहरूखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडिओत 1997 मध्ये शाहरूखच्या 'दिल तो पागल है' सिनेमातील लोकप्रिय गाणं 'भोली सी सुरत' यावर व्हिडिओ केला आहे. 




शाहरूख खानचा वाढदिवस जगभरात साजरा केला जातो. त्याने साकारलेल्या सगळ्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत. 54 व्या वर्षी देखील शाहरूख चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. शाहरूख फक्त अभिनेता म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून देखील चाहत्यांना भावतो. त्याचं त्याच्या मुलांसोबत असलेलं खास नातं कायमच आपल्याला दिसत राहिलं आहे. शाहरूखची मुलगी सुहाना देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे.