मुंबई : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' सिनेमाने सर्वांची मन जिंकली. एवढंच  नाही तर, सिनेमांत ज्या कलाकारांनी भूमिका बजावली त्यांचं देखील सर्वत्र कौतुक झालं. अभिनेता सिद्धर्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणीने मुख्य भूमिका साकारत युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल यांची कथा प्रेक्षकांसमोर आणली.. सिनेमात अभिनेता निकितिन धीरने महत्त्वाची भूमिका बजावली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता  निकितिन धीरच्या आयुष्यात लवकरचं खास व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.  निकितिन धीर आणि पत्नी कृतिका सेंगर त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. नुकताचं  निकितिनने सोशल मीडियावर पत्नीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. 



फोटोमध्ये कृतिकाचे बेबी बम्प दिसत आहेत.  निकितिनने आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये,  'आनंदाच्या मार्गावर....' असं लिहिलं आहे. 


सध्या निकितिनची खास पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्ट फक्त चाहतेचं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. 


अभिनेता निकितिन धीर आणि कृतिका सेंगर यांनी 2014 मध्ये लग्न केले आणि आता सात वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपे लवकरच आई-बाबा होणार आहेत.