Nikki ची साडे तीन लाखांची पर्स अखेर समोर, ज्यामुळे अभिनेत्री अडकली वादाच्या भोवऱ्यात?
मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस (Big Boss) फेम निक्की उर्फ निकिता तांबोळी नुकतीचं एका ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्या एका पर्समुळे निक्की वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे, त्याच पर्सला फ्लॉन्ट (Flaunt) करताना ती दिसली आहे.
Nikki Tamboli: कॉनमन सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) अभिनेत्री निक्की तांबोळीचं नाव जोडलं गेलं आहे. त्यानंतर निक्की पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल (Trolls on social media) झाली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्यासोबत यापूर्वी जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांचं नाव जोडलं गेलं आहे. कारण या अभिनेत्री सुकेशला भेटण्यासाठी तुरुंगात गेल्या होत्या.
मराठमोळी अभिनेत्री आणि बिग बॉस (Big Boss) फेम निक्की उर्फ निकिता तांबोळी नुकतीचं एका ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्या एका पर्समुळे निक्की वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे, त्याच पर्सला फ्लॉन्ट (Flaunt) करताना ती दिसली आहे. (Nikki Tamboli spotted three and half lakhs Gucci bag and Sukesh Chandrashekhar case nm)
झालं असं की, निक्की ब्लू रंगाच्या ड्रेस घालून एका पर्ससोबत (Ladies Purse) ती कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. तिच्या हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर ती ट्रोल होते आहे. काही यूजर्स तिला पर्स बद्दल विचारत आहे तर काही यूजर्स तिला 'पोलीस पकडतील दीदी बाहेर नको निघूस' असा सल्ला देत आहेत.
रिपोर्टनुसार, निक्की तिहार तुरुंगात (Tihar Jail) सुकेशला दोनदा भेटली आहे. ईडीनं (ED) दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये असं म्हटलं आहे की, एप्रिल 2018 मध्ये सुकेशनं पिंकीला 10 लाख रुपये दिले होते. त्यापैकी 1.5 लाख रुपये निक्की तांबोळीला दिले होते. दुसऱ्यांदा, म्हणजेच त्यांच्या पहिल्या भेटीच्या काही आठवड्यांनंतर, निक्की एकटीच सुकेशला भेटायला गेली तेव्हा तिला 2 लाख रुपये आणि एक गुच्ची बॅग (Gucci bag) देण्यात आली होती. निक्कीला 3.5 लाख रुपयांची ही बॅग होती.
या व्हिडीओमध्ये निक्कीसोबत तीच 3.5 लाख रुपयांची पर्स असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. दरम्यान मूळचा कर्नाटकातील (Karnataka) बंगळुरूचा (Bangalore) रहिवासी असलेला सुकेश सध्या दिल्लीच्या (Delhi) तुरुंगात आहे आणि त्याच्यावर 10 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.